नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या तारखा या आठवड्यात जाहीर होणार असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगाल आणि आसामसह 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा 2021 निवडणुकीच्या तारखांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची आज बैठक दिल्लीत होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांना अंतिम रूप देण्याबाबत चर्चा होईल. पश्चिम बंगालशिवाय यावर्षी मे-जूनमध्ये आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.


मतदान केंद्रांमध्ये होऊ शकते वाढ?
कोरोना व्हायरस आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत निवडणुका होत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र वाढवली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. 


कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू


यंदा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं नाही. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. 


पश्चिम बंगालमध्ये अनेक दशके राजकीय ध्रुवीकरणात मर्यादित उपस्थिती राहिल्यानंतर, 2021च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने (भाजप) 2019 च्या लोकसभेच्या 42 पैकी 18 जागा जिंकल्या मात्र थोड्या फरकानं भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये भाजपनं कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.