नवी दिल्ली : जोधपूर कोर्टाने आसाराम बापूला दोषी ठरवलं आहे. आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम भारतात केव्हा आला आणि बाबा बनण्याआधी काय करायचा हे ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. टाइम्‍स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार बाबा बनण्याआधी आसाराम टांगा चालवायचा. काही दिवस चहा विकण्याचं काम देखील आसारामने केलं. आसारामचे वडील लाकडं आणि कोळसा विकायचे. आसारामचं खरं नाव आसुमल हरपलानी आहे. आसाराम पाकिस्तानातील सिंध मधील जाम नवाज अली येथील राहणारा होता. पण फाळणीनंतर तो अहमदाबादला आला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर एका बाबाच्या संगतीत राहून नंतर आसाराम देखील बाबा बनला.


अजमेरमध्ये चालवायचा टांगा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाराम बाबा बनण्याआधी अजमेर शरीफमध्ये टांगा चालवायचा. 2 वर्षानपर्यंत आसारामने रेल्वे स्‍टेशन ते दरगाह शरीफ पर्यंत टांगा चालवायचा. त्यावेळी कोणाला ही माहित नव्हतं की पुढे जाऊन आसाराम अध्यात्मिक बाबा बनेल. 


वयाच्या 15 व्या वर्षी आसारामने घर सोडलं आणि गुजरातच्या भरुचमध्ये एका आश्रमात राहयला लागला. 1960 च्या दशकात आसारामने लीलाशाह यांना आपलं आध्यात्मिक गुरु बनवलं. यानंतर लीलाशाह यांनी असुमलचं नाव आसाराम ठेवलं. सुरुवातीला प्रवचन नंतर प्रसादाच्या नावावर भोजन दिला जायचा. यानंतर आसारामच्या अनुयायींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.


1973 मध्ये बनवलं पहिलं आश्रम


1973 मध्ये आसारामने पहिलं आश्रम आणि ट्रस्टची स्थापना अहमदाबादच्या मोटेरा गावात केली. 1973 ते 2001 दरम्यान आसारामचा मुलगा नारायण साईसोबत भारतातच नाही तर विदेशातही 400 आश्रम बनवले. अनेक गुरुकुल, महिला केंद्र बनवले. त्य़ानंतर 1997 ते 2008 दरम्यान आसारामवर बलात्कार, जमीन बळकावणे, हत्या यासारखे आरोप झाले. 2008 मध्ये जेव्हा एका मुलाचा मृत्यू आसारामच्या आश्रमात झाला तेव्हा त्याच्यावर तांत्रिक क्रिया केल्याचा आरोप आसारामवर झाला.