मुंबई : रेशन कार्ड हा सगळ्यात महत्वाचा दस्तऐवज आहे, ज्याच्या आधारावर देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळते. रेशन कार्ड संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. जसे रेशनकार्डचे किती प्रकार आहेत. रेशन कार्डवरती आणखी काय मिळतं? रेशन कार्ड कशासाठी उपयोगी आहे? तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील अनेक राज्यांमध्ये रेशन दुकानांवर बायोमेट्रिक फिंगरप्रिंट तुम्हाला दिसले असेल, प्रथम तुम्हाला तुमचे रेशन कार्ड त्या मशिनला लिंक करावे लागेल, असे केल्याने  बनावट रेशन कार्डला आळा बसू शकतो, तसेच तुमच्या नावावर कोणा दुसऱ्या वक्तीला रेशन घेऊन जाता येणार नाही.


रेशन कार्डचे असंख्य फायदे आहेत. भारतात आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी म्हणजेच गरीबांसाठी रेशन कार्डचीमुळे स्वस्त दरात धान्य मिळते, तसेच त्यावर रॉकेल देखील मिळते. ज्यामुळे गरीब लोकांच्या घरी चूल पेटू शकते.


रेशन कार्ड हा तुमची ओळख सांगतो. म्हणून तो एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. रेशन कार्ड ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरता येते.


नवीन गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, सिम कार्ड मिळवण्यासाठी आणि मतदार ओळखपत्र मिळवण्यासारख्या इतर महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही तुमचे रेशन कार्ड वापरू शकता.