मुंबई : सध्या भारताच्या अर्थ जगताला नवा विषय मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई,पुणे, नाशकातल्या मध्यमवयीन उच्च माध्यमवर्गात एकच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो बिटकॉईन... पण बिटकॉईनमधली गुंतवणूक वर्षगणित काही पटींनी परतावा देतेय. त्यामुळे उच्चमध्यमवर्गात त्याविषयीचं कुतुलह वाढत चाललं आहे. पण सरकार मात्र त्याविषयी चांगलचं संभ्रमात आहे.


अर्थविश्वात आज काल बिटकॉ़ईन हा परावलीचा शब्द झाला आहे. गेल्या दोन वर्षात तर बिटकॉईननं गुंतवणूकदारांना जे दिलंय..ते आज इतर कशातूनही दिलेलं नाही. गेल्या वर्षी 1 बिटकॉईनची किंमत सुमारे 17 हजार ड़ॉलर्सपर्यंत गेली. पण भारतात ही बिटकॉईनची गुंतवणूक बेकायदेशीर नसली. तरी कायदेशीरही नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय नविन. जे कायदेशीर नाही .ते बेकायदेशीर असणारच,पण बिटकॉईनचं हे असंच आहे.


काय आहे बिटक्वाईन?

बिटकॉईन ही एक प्रकरचा क्रिप्टो करन्सी असून त्यावर जगातल्या कुठल्याही देशाचं बंधन नाही. जपानमध्ये ऑक्टोबर 2008 नाकमोतो नावाच्या एका प्रोग्रॅमनं क्रिप्टोग्राफी मेलिंग लिस्ट तयार केली. बिटकॉईन साठी कुठल्याही बँकेची गरज नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून थेट बिटकॉईन खरदेविक्री करु शकते. बिटकॉईन फक्त ऑनलाईनच ठेवता येता..म्हणजे क्लाऊड, किंवा इ वॉलेटमध्येच बिटकॉ़ईन बाळगता येतात. बिटकॉ़ईनचं यश बघता गेल्या आज काही वर्षात मोठ्या प्रमाणात दुसऱ्या क्रिप्टो करन्सीही सुरू झाल्या आहेत.  


बिटकॉ़ईनचा मर्यादीत पुरवठा हेच त्याचं यूएसपी आहे. आणि मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर बिटकॉईनचा भाव ठरतो. 2140 पर्यंत साधारण दोन कोटी बिटकॉईन्स बाजारात येतील. आणि त्यानंतर बिटकॉईनचं मायनिंग शक्य होणार नाहीत. भारतात बिटकॉइनचा जवळपास तीन वर्षांपूर्वी झाला. पण अद्याप त्याला भारतात कुठलचं निश्चित स्टेटस नाही. त्यामुळे बिटकॉ़ईनमध्ये गुंतवणूक जितकी फायद्याची आहे...तितकीच जोखमीची आहे...त्यामुळे गुंतवणूक करताना थोड जपूनच...


पुलं देशपांडेचे एक गाजलेलं वाक्य आहे....तुम्हाला पुणेकर व्हायचंय काय? नक्की व्हा...पण आमचा सल्ला हा...की पुन्हा विचार करा. बिटकॉ़ईनच्या बाबतीत हे समीकरण अगदी चपखल बसतं...गुंतवणूक करायची का? पण पुन्हा विचार करा...