मुंबई : भारतीय रेल्वे दररोज लाखो लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याचे काम करते.  रेल्वेचा प्रवास सर्वांनाच परवडणारा असतो, ज्यामुळे बरेचसे लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रत्येक वर्गातील प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. ज्यामुळे ते आपल्या प्रवाशांच्या गरजे नुसार रेल्वेचे नियम तयार करत आहेत. याशिवाय रेल्वे प्रवाशांना आणि त्यांच्या सामानाला सुरक्षा देण्यासाठी देखील रेल्वे आपल्यापद्धतीने प्रयत्न करत आहे. असे अनेकवेळा घडते की प्रवासी त्यांचे सामान ट्रेनमध्ये विसरुन जातात, अशा परिस्थितीत रेल्वे ते सामान प्रवाशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु लोकांना हा प्रश्न पडला आहे की, अशा स्थितीत ट्रेनमध्ये बॅग विसरली असेल तर, काय करायचे? आपण त्याआधी ट्रेन आपल्या सामानाचं काय करते, हे जाणून घेऊ या.


प्रवाशाची बॅग जेव्हा ट्रेनमध्ये राहते तेव्हा ती स्टेशनवर जमा केली जाते. वास्तविक, उरलेल्या पिशव्या इत्यादी रेल्वे कर्मचारी स्टेशन मास्टरकडे जमा करतात. यानंतर मालाच्या आधारे पुढील प्रक्रिया ठरवली जाते.


उदाहरणार्थ, बॅगमध्ये दागिने असल्यास ते २४ तास रेल्वे स्टेशनवर ठेवले जाते. जर कोणी या वस्तूवर २४ तासांत हक्क सांगितला तर तो त्याला दिला जातो. जर कोणी दावा केला नाही, तर त्याला झोन कार्यालयात पाठवले जाते.


त्याच वेळी, जर सामान्य गोष्टी बॅगेत असतील, तर तीन महिन्यांचा कालावधी आहे. रेल्वे अधिकारी ते तीन महिने त्यांच्याकडे ठेवतात आणि त्यानंतर ते पुढे पाठवले जातात. वस्तू बराच काळ पडून राहिल्यास त्याची विक्री किंवा विल्हेवाट लावण्याचेही नियम आहेत.


जर तुमची बॅग राहिली तर काय करावे?


ट्रेनमध्ये तुमची बॅग चुकून राहिली, तर तुम्ही रेल्वे पोलिसांना त्याची माहिती द्यावी. यासाठी तुम्ही आरपीएफमध्ये एफआयआरही नोंदवू शकता. अशा परिस्थितीत तुमचा माल शोधण्याचा प्रयत्न करणे ही रेल्वे आणि पोलिसांची जबाबदारी बनते. अशा प्रकारे तपास पुढे जातो, ज्यामुळे तुम्हाला तुमची बॅग पुन्हा मिळू शकते.