मुंबई : आता सर्वसामान्य माणूसदेखील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवण्यात रस दाखवत आहे. हेच कारण आहे की, गेल्या एका वर्षात अनेक डीमॅट खाते खोले गेल्याची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे 69 दशलक्ष डीमॅट खाती आहेत. तथापि, इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही खूपच कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील लोक भारतीय शेअर बाजारामध्ये सर्वाधिक पैसे गुंतवत आहेत. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ते मिझोरम या भागातील लोक स्टॉक मार्केटमधून चांगली कमाई करीत आहेत.


स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची पहिली आवश्यकता म्हणजे लोकांकडे डिमॅट खाते असणे. या खात्यात शेअर्स, ईटीएफ, बाँड्स, म्युच्युअल फंड आणि सिक्युरिटीजला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात.


हे डीमॅट खाते डिपॉजिटरीज एनसडीएल आणि सीडीएसलद्वारे उघडता येते. देशात अनेक स्टॉक ब्रोकिंग कंपन्या आहेत, ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करतात. केवळ स्टॉक ब्रोकिंग कंपन्याच ही सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. या सुविधेच्या बदल्यात या दलाली करण्याऱया संस्था ग्राहकांना खूप कमी शुल्क आकारतात.


परंतु या दलाली संस्था काही कारणास्तव बंद पडण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुमची गुंतवणूक पूर्णपणे बुडेल का? आपल्या सर्व पैशांसह स्टॉक ब्रोकिंग कंपनी पळून जाईल का? गुंतवणूकदार म्हणून असे प्रश्न तुमच्या मनात उद्भवलेच असतील आणि प्रत्येक व्यक्ती आपले पैसे कुठे ही गुंतवण्यापूर्वी हा विचार तर करतोच, पण आता याची चिंता करण्याची गरज नाही. कारण अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


जर दलाली कंपनी बंद पडली तर, तुमच्या गुंतवणूकीचे काय होईल?
स्टॉक ब्रोकिंग कंपनी डिफॉल्ट किंवा बंद झाल्यानंतरही आपले भांडवल किंवा फंड पूर्णपणे सुरक्षितच राहतील. आता हे ऐकून तुमचे थोडेसे टेन्शन दूर होऊ शकते. कारण तुमचे भांडवला घेऊन स्टॉक ब्रोकर पळून जाईल असे होणे शक्य नाही. उदाहरणार्थ, हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला तेव्हा त्याची ब्रोकिंग कंपनी ग्रो मोअर रिसर्च अँड अ‍ॅसेट मॅनेजमेन्टवर सेबीने बंदी घातली होती. परंतु या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैशाची गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे नुकसान झाले नाही.


सर्वप्रथम आपणास हे समजणे आवश्यक आहे की, या स्टॉक ब्रोकिंग कंपन्या केवळ मध्यस्थ म्हणून काम करतात. त्यांना आपल्या निधीवर थेट प्रवेश नाही. परंतु आपण त्यांना आपल्या पैशांचा किंवा भांडवलाचा वापर त्यांनी कुठे आणि कसा करावा याच्या सूचना देऊ शकता.


स्टॉक्स आणि शेअरचे काय होईल?


तुमचे फंड  डिमॅट खात्यात जमा केले जातात. हे डिमॅट खाते डिपॉझिटरीजसह उघडलेले आहे. सेबीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड  (CDSL)  या दोन ठेवींना मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील गोष्टींसाठी सेबी जबाबदार आहे.


कोणत्याही वेळी गुंतवणूकदार ब्रोकरेज फर्मसह स्टॉक किंवा शेअर फर्म त्यांकडे ठेवत नाही. ते फक्त प्लॅटफऑर्म म्हणून काम करतात. त्यांचे काम फक्त आपल्या सूचनांनुसार आपल्या जागेवर व्यापार करणे आहे. त्या बदल्यात ते तुमच्याकडून शुल्क घेतात.


त्याचप्रमाणे तुमची म्युच्युअल फंडाची गुंतवणूक एसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) कडे आहे. अशा परिस्थितीत, जरी ब्रोकरेज फर्म जरी बंद झाली तरी आपला म्युच्युअल फंड सुरक्षित राहील.