गरुड पुराणानानुसार, स्वप्नात जर कावळा दिसला तर काहीतरी वाईट घडेल,अशुभ संकेत आहे असं म्हटलं जातं..मात्र कावळा स्वप्नात दिसण्याचा अर्थ प्रत्येक वेळी अशुभच असेल असं नाही. अनेक वेळा हे शुभ देखील असू शकते.  चला सविस्तर जाणून घेऊया


1.हातात कावळा पकडलेला दिसणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


स्वप्न शास्त्रानुसार, तुम्ही कावळ्याला हातात पकडलेले स्वप्न पाहिले तर हा शुभ संकेत असतो. याचा अर्थ ,तुमच्या आणि कुटुंबियांच्या गरजा लवकरच पूर्ण होणार आहेत.


2.कावळा आकाशात उडतोय


 
स्वप्नात उडणारा कावळा दिसणे म्हणजे वाईट अपशकुन समजला जातो याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात मोठं संकट येणार आहे.तुमची नोकरी सुद्धा संकटात येऊ शकते .पैसे आणि वेळ वाया जाण्याची शक्यता दाट असते.


3. डोक्यावर कावळा बसलेला दिसणे



कावळा डोक्यावर बसला आहे असं स्वप्न जर तुम्हाला पडलं असेल तर तुमच्या तुमच्यासोबत किंवा कुटुंबियांसोबत काही तरी वाईट घडणार आहे असा अर्थ सांगितला गेलाय.


4. भीतीदायक आवाज



रडणारा किंवा भीती वाटेल असे आवाज काढणारा कावळा किंवा कावळ्यांचा समूह जर तुमच्या स्वप्नात येत असेल तर सावधान!  ही धोक्याची घंटाआहे ,हे स्वप्न म्हणजे लवकरच तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्याबाबतीत मृत्यूचे संकेत आहेत असं म्हटलं जात 


स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाला काहींना काही अर्थ असतो असं म्हटलं गेलाय .माञ आपण काय आणि कधी स्वप्न पहिली यावर त्या स्वप्नांचा अर्थ लावला जातो असं  स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलयं.