काँग्रेस खासदाराला आयकर विभागाने जप्त केलेले 351 कोटी परत मिळणार?
प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार अघोषित संपत्तीवर करासह दंडही ठोठावला जातो. कररचनेनुसार, 300 टक्के करत आणि दंड लावला जाऊ शकतो.
काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत आयकर विभागाने 351 कोटी जप्त केले आहेत. घऱात सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाचे सर्व अधिकारी चक्रावले होते. याचं कारण घरात सगळीकडे 500 आणि 200 रुपयांच्या नोटा पडलेल्या होत्या. तब्बल पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत होते. जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे.
आयकर विभागाने 6 डिसेंबरला धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30 कपा़टांमध्ये ही रोख रक्कम सापडली. बालंगीर जिल्ह्यात सर्वात जास्त रक्कम सापडली आहे, जी अंदाजे 305 कोटी आहे. त्यानंतर संबलपूर आणि टिटलागड येथे अनुक्रमे 37.5 कोटी आणि 11 कोटी सापडले आहेत.
एसबीआयचे स्थानिक व्यवस्थापक भगत बेहरा यांनी सांगितलं आहे की, टीमने 176 पैकी 140 बॅगेंची मोजणी केली असून, अद्याप 36 बाकी आहेत. "आम्हाला 176 बॅग मिळाल्या असून त्यापैकी 140 ची मोजणी झाली आहे. उर्वरित बॅगेंची आज मोजणी केली जाईल. 3 बँकांचे अधिकारी मोजणी प्रक्रियेत सहभागी आहेत, आणि आमचे 50 अधिकारी सहभागी आहेत. सुमारे 40 काऊटिंग मशीन येथे आणण्यात आल्या आहेत. 25 मशीन्स वापरल्या जात असून 15 बॅकअप म्हणून ठेवल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. जप्त करण्यात आलेला सगळा काळा पैसा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पण आता या पैशांचं पुढे काय होणार?
धीरज साहू यांच्या घरी सापडलेल्या बेहिशोबी मालमत्तेनंतर आता करचोरीचा तपास आणखी वेगाने होऊ शकतो. आयकर नियमानुसार, अघोषित संपत्तीवर करासह दंडाची तरतूद आहे. कररचनेनुसार, 300 टक्के कर आणि दंड ठोठावला जाऊ शकतो. नियमानुसार, धीरज साहू यांना त्यांच्या ठिकाणांवर सापडलेली सपंत्ती पुन्हा मिळणं कठीण आहे. याउलट त्यांना त्यावरील करही भरावा लागू शकतो.
अघोषित संपत्ती प्रकरणी आयकर विभागाकडून अधिक 33 टक्के कर लावला जाऊ शकतो, ज्यामधील 3 टक्के सरचार्ज असतो. यानंतर 200 टक्क्यांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. नियमांनुसार, जप्त केलेली मालमत्ता चालू आर्थिक वर्षात घेतली असेल, तर त्यावर एकूण 84 टक्के कर आणि दंड वसूल केला जाईल. पण जर हा काळ्या पैशांची कमाई मागील वर्षांची असेल तर त्यावर 99 टक्क्यांपर्यंत कर आणि दंड वसूल केला जाऊ शकतो.