Difference between Terminal, Junction & Central: रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलं आहे.  रेल्वे नेटवर्क जवळपास 65 हजार किमी लांब आहे. देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7,349 इतकी आहे. अजून रेल्वे आपलं जाळं देशातील कानाकोपऱ्यात विणत आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीयाचं वेगळंच नातं आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित असल्यानं सर्वाधिक पसंती दिली जाते. त्याचबरोबर हवाई वाहतुकीच्या तुलनेत प्रवास स्वस्त देखील आहे. रेल्वेतून प्रवास करताना अनेक स्थानकं नजरेसमोरून जातात. काही रेल्वे स्थानकांची नावं त्या त्या ठिकाणांवरून असतात. पण कही स्थानकांच्या नावापुढे जंक्शन (Junction), टर्मिनल/टर्मिनस (Terminal/Terminus) आणि सेंट्रल (Central) असं लिहिलेलं असतं. असं लिहिण्यामागे नेमका हेतू काय? जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टर्मिनल/टर्मिनस (Terminal/Terminus): टर्मिनल आणि टर्मिनस या दोन्ही शब्दांमध्ये कोणताही फरक नाही. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. रेल्वे टर्मिनल अर्थ शेवटचं स्टेशन असं होतं. याचा अर्थ या स्टेशनपुढे ट्रेन जात नाही. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल (Anand Vihar Terminal), मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) यांचा समावेश आहे.


जंक्शन (Junction): काही स्टेशनच्या पुढे जंक्शन असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ या स्टेशनवरून एकापेक्षा अधिक रूट जात असतात. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर कमीत कमी तीन मार्ग असतात. यामुळे रेल्वे ट्राफिक होत नाही. वाहतूक सुरळीत करणं सोपं जातं. 


Eight Wonders: या ठिकाणी तयार होतेय जगातील आठवं आश्चर्य! पाहा Video


सेंट्रल (Central): रेल्वे स्थानकासोबत सेंट्रल लिहिलं असेल तर शहरातील मुख्य ठिकाण असल्याचं समजून येतं. या ठिकाणी एकापेक्षा जास्त ट्रेन येत असतात. सेंट्रल स्टेश अशा ठिकाणी तयार केले आहेत, जिथे इतर रेल्वे स्थानकं अस्तित्वात आहेत. उदा. मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल आणि चेन्नई सेंट्रल यांचा समावेश आहे.