नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाउन सुरू आहे. जर केंद्र सरकारच्या आकडेवारीवर विश्वास ठेवला गेला तर पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गापासून बचाव करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्याने लागू करुनच संपूर्ण कोरोनावर मात केली जावू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यानंतर लोकांना कसे नियंत्रित करावे हा मोठा प्रश्न आहे. यासाठी आवश्यक धोरणे तयार करावी लागतील. लॉकडाउन संपताच लाखो लोकं घराबाहेर पडतील आणि रस्त्यावर उतरतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सांगितले होते की, आपण आपल्या राज्यातून लॉकडाउन कसे काढू शकता. आपल्या राज्यांच्या स्थितीच्या आधारे, यावर एक अहवाल तयार करा आणि तो केंद्राकडे पाठवा. असं देखील त्यांनी म्हटलं होतं.ृ


सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार राज्यांनी पाठविलेल्या अहवाल तसेच जिल्हा मंत्री, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि एसएसपी यांच्या अहवालाच्या आधारावर लॉकडाऊन हटवण्याबाबत रणनीती आखेल.


केंद्र सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार देशातून लॉकडाऊन एकाच टप्प्यात उघडला जाईल. परंतु कोरोना विषाणूचा जास्त परिणाम झालेल्या सर्व राज्यात लॉकडाऊन सुरूच राहणार आहे. पण त्यासाठी येणाऱ्या काळात रुग्णांची संख्या नियंत्रणात राहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यानुसारच सरकार पुढील निर्णय़ घेईल.


देशात जेथे लॉकडाऊन हटवलं जाईल. त्या ठिकाणी लगेचच कलम १४४ जमावबंदी लागू करण्यात येईल. म्हणजेच ४ किंवा त्या पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.