शिवशक्ती, तिरंगा पॉइंटच्या आधी चंद्रावर अस्तित्वात आहे जवाहर पॉइंट, काय आहे या मागची गोष्ट
Jawahar Point Moon: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन मोहीम पूर्णपणे यशस्वी केली. यानंतर जगभरातून याचे कौतुक होत आहे.
Jawahar Point Moon: चांद्रयान-३ (Chandryaan 3) मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे उतरले होते. त्या जागेला आता शिवशक्ती पॉइंट (Shivshakti Point) म्हणून ओळखले जाणार आहे. तर, चांद्रयान-2 (Chandryaan 2) मोहिमेदरम्यान चंद्राच्या ज्या भागात भारताचे यान कोसळले त्या भागाला तिरंगा पॉइंट नाव दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथील इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याची घोषणादेखील केली आहे. दरम्यान, ही एक परंपरा असून ज्या ठिकाणी लँडरची सॉफ्ट लँडिग होते त्या जागेचे नामकरण केले जाते. मात्र, चंद्रावर शिवशक्ती पॉइंटच्या अगोदरच जवाहर पॉइंट अस्तिवात आहे. या मागची कहाणी जाणून घेऊया. (Jawahar Point Moon)
चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिगनंतर जवाहर पॉइंट सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर जवाहर पॉइंटच्या नावावर आक्षेप घेतला होता. जेथे चांद्रयान-1चे सॉफ्ट लँडिग करण्यात आले होते. त्या जागेचे नाव जवाहर पॉइंट ठेवण्यात आले होते. आता यावरुनच पुन्हा एकदा जवाहर पॉइंट चर्चेत आले आहेत.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये चांद्रयान मोहिमेची घोषणा केली होती. 15 ऑगस्ट 2003 मध्ये चांद्रयान मोहिमेची सुरुवात केली होती. नोव्हेंबर 2003 मध्ये भारत सरकारने भारत सरकारने पहिल्यांदा भारतीय चांद्रमोहिमेला इस्रोच्या चांद्रयान-1ला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर जवळपास पाच वर्षांनंतर भारताच्या माजी पंतप्रधानांच्या कार्यकाळात 22 ऑक्टोबर 2008 च्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात चांदयान-1 मोहिम लाँच करण्यात आली. चांद्रयान-1 ला PSLV-C11 या रॉकेटमधून लाँच करण्यात आले. चांद्रयान-1 मिशनमध्ये एक ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब (MIP)देखील होते. या मिशनमध्ये जवळपास 386 कोटींचा खर्च आला होता. या मोहिमेअंतर्गंत चंद्राच्या कक्षेत दोन वर्षांपर्यंत सर्वेक्षण करणे आणि तेथे असलेल्या केमिकल कॉम्पिजीशनचा मॅप बनवणे हे चांद्रयान -1चे मुळ उद्दिष्ट्य होते.
चांद्रयान-1ला 22 ऑक्टोबर 2008मध्ये लाँच करण्यात आले होते. 8 नोव्हेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी ऑर्बिट चंद्रापासून 100 किमी दूर होते. 14 नोव्हेंबर 2008 रोजी चांद्रयान-1 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आधी क्रॅश लँडिग झाले. चांद्रयान-1चे ज्या ठिकाणी क्रॅश लँडिग झाले त्या जागेला Shackleton क्रेटर म्हणतात. दरम्यान, ज्या दिवशी चांद्रयान क्रॅश झाले तो दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची जयंती होती. त्यामुळं त्या जागेचे नाव जवाहर पॉइंट असं ठेवण्यात आले.