मुंबई : आपल्याला महिन्याला जसे पैसे येतात तसे आपण त्याने उरलेले आपली उधारी, दुध वाल्याचे पैसे, लाईट बिल वैगरे देऊन उरलेल्या पैशात महिन्याचे नियोजन करुन तो महिना काढतो. परंतु बहुतेक लोकांच्या बाबतीत असे होते की, त्यांचा पगार मिळतो तेव्हा तो असा खर्च होतो की, महिना अखेरपर्यंत त्यांना पैसे पूरत नाहीत. कारण मधेच जर वैद्यकीय किंवा इतर कोणता सण आला तर लोकांचं पूर्ण नियोजन खराब होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेते, काही लोकं तर त्यांचे FD मोडतात. तर काही लोकं त्यांची LIC वैगरे बंद करुन त्याचे पैसे घेतात. परंतु असे करणे हा योग्य पर्याय नाही.


समजा जर अशी परिस्थितीत, तुमच्या समोर आली तर, पगाराचा ओव्हरड्राफ्ट हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू आहे. ज्यामुळे तुमचा अचानक होणारा खर्च पूर्ण होण्यास मदत होते आणि त्यासाठी तुम्हाला तुमची FD  देखील मोडावी लागणार नाही.


वास्तविक, जर तुम्ही नोकरी करत असाल तर बँक आपल्या ग्राहकांना पगाराच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देते. या अंतर्गत, तुम्ही खात्यात जितकी रक्कम आहे, त्यापेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढू शकता. यात तुम्ही तुमच्या पगारापेक्षा तीन पटीने जास्त पैसे बँकेतून घेऊ शकता. म्हणजेच, तुमच्या खात्यात शिल्लक नसले तरीही, तुम्ही यापेक्षा जास्त पैसे काढू शकता.


सॅलरी ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? तर हा एक प्रकारचा कर्ज आहे आणि तो तुमचा रेकॉर्ड पाहिल्यानंतर बँकेकडून तुम्हाला दिला जातो. तुम्हाला त्याच्या परतफेडीवर व्याज द्यावे लागते.


परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की, त्याचे व्याज हे क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त आहे आणि दरमहा एक ते तीन टक्के व्याज आकारले जाऊ शकतो. 


यामधून पैसे काढणे सोपे आहे. हा ओव्हरड्राफ्ट पूर्व-मंजूर आहे आणि त्याला मर्यादा आहे. तुम्ही काही मिनिटांत मर्यादेपर्यंत पैसे काढू शकता. तथापि, प्रत्येक बँकेचे स्वतःचे वेगवेगळे नियम असतात.


काही बँका तुमच्या मासिक पगाराच्या 2-3 पट ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. त्याच वेळी, काही बँका ही सुविधा एका महिन्याच्या पगाराच्या फक्त 80-90 टक्के पर्यंत देतात.