Term Insurance: जीवन हे अनिश्चित असून कधी काय होईल सांगता येत नाही. एखादं मोठं संकट ओढावलं तर कुटुंबाचं भविष्य कठीण होतं. यासाठी भविष्याचा वेध घेऊन कुटुंबासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी टर्म इंश्युरन्स (Term Insurance) सर्वात महत्त्वाचा आहे. विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला पॉलिसीमधील निश्चित रक्कम मिळते. त्यामुळे कठीण काळात कुटुंबाला आधार मिळतो. पण टर्म इंश्युरन्स घेताना त्याबाबतची माहिती असणं आवश्यक आहे. टर्म इंश्युरन्स घेताना तीन महिन्यांची सॅलरी स्लीप, आधार कार्ड, पॅनकार्ड, सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट, कोविड लस घेतल्याचं सर्टिफिकेट, फोटो आवश्यक आहे. आपल्या वयानुसार टर्म पॉलिसी रक्कम निश्चित होते. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं आहे. कारण यामुळे भविष्यात क्लेम करताना कोणतीही अडचण येत नाही. 


इंश्युरन्स कवर असं निश्चित कराल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टर्म इंश्युरन्स वयानुसार निश्चित केला जाऊ शकतो. जर तुम्ही 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर मिळकतीच्या 25-30 पट कवर घ्यावं. जर वय 30-45 वर्षांमध्ये असेल तर मिळकतीच्या 15-20 पट कवर घ्यावं. जर वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मिळकतीच्या 10 पट विमा घ्यावा. आपल्या मिळकतीवर किती जण अवलंबून आहेत याचा अंदाज घेणं गरजेचं आहे. 


कमी वयात टर्म इंश्युरन्स घेण्याचे फायदे


कमी वयात टर्म इंश्युरन्सकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. या पॉलिसीत गुंतवणूक फायदेशीर नसते असा समज असतो. पण आयुष्याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे कमी वयात टर्म इंश्युरन्स घेतल्यास फायदा होतो. प्रिमियम कमी असल्याने पॉलिसी रक्कम भरणं सोपं होतं. 


बातमी वाचा- Credit Card Account बंद करण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागतो, जाणून घ्या नियम


टर्म इंश्युरन्स घेताना या बाबी लक्षात ठेवा


  • टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान अंतर्गत कमी प्रिमियमध्ये चांगलं कवर मिळतं. पण स्मोकिंग किंवा अल्कोहल घेत असल्यास यासाठी जास्त प्रीमियम द्याव लागू शकतं. 

  • टर्म इंश्युरन्स घेताना विविध कंपन्यांची ऑफर्स पाहा. पॉलिसी बेनेफिट्स, फीचर्स, प्रीमियम रक्कम याची माहिती घ्या. त्यानंतर पॉलिसी विकत घ्या.

  • पॉलिसीच्या कालावधीबाबत माहिती घ्या. कारण कमी अवधी असल्यास कुटुंबासाठी अडचणीचा ठरू शकतो. किमान 85 वर्षे इतका असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा अधिक कालावधीचा प्लान महाग पडू शकतो.

  • टर्म इंश्युरन्स पॉलिसी वार्षिक मिळकतीच्या 10 ते 20 पट इतकी असणं गरजेचं आहे.

  • टर्म इंश्युरन्स प्लान ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न करा. कारण गरजेनुसार तुम्ही तुमचा प्लान निवडू शकता. तसेच प्लान आपल्याला स्वस्त पडू शकतो. यात सर्व डिटेल्स आपण स्वत: भरतो त्यामुळे चूक होत नाही.