Credit Card Account Closing Process: क्रेडिट कार्ड मिळवणं तसं कठीण असतं. बँका खातेदाराची शहनिशा आणि सिबिल रेकॉर्ड चेक करूनच क्रेडिट कार्ड देतात. मात्र एकदा क्रेडिट कार्ड हाती आलं की ऑनलाईन शॉपिंगचा धडका लावला जातो. कधी कधी इमरजेंसी असताना क्रेडिट कार्डची साथ मिळते. दुसरीकडे क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर असल्याने त्याचा फायदा होतो. असं असताना क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे. आरबीआयने या संबंधित एक नियम जारी केला आहे. यामुळे क्रेडिट कार्ड बंद करण्यास मदत होणार आहे. सदर बँकेनं अकाउंट बंद करण्यास टाळाटाळ किंवा उशीर केल्यास त्यांना तुम्हाला दंड द्यावा लागेल.
आरबीआयचा नियमानुसार, खातेदाराला आपलं क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर बँकेला अर्ज स्वीकारावा लागेल. तसेच 7 दिवसांच्या आत अकाउंट बंद करावं लागेल. मात्र खातेदारांना आपलं शिल्लक रक्कम भरावी लागेल. आरबीआयचा हा नियम 1 जुलै 2022 पासून लागू आहे. जर बँकेनं अकाउंट बंद करण्यास उशीर केला तर खातेदारालाच पैसे द्यावे लागतील.
नियमानुसार क्रेडिट कार्ड कंपन्यांना क्लोजर रिक्वेस्ट अर्ज स्वीकारणं अनिवार्य आहे. यासाठी डेडिकेटड ईमेल-ID, हेल्पलाईन नंबर, आयव्हीआर, ऑफिशियल वेबसाइट लिंक, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल अॅप असे पर्याय देणं आवश्यक आहे. कंपन्यांना क्रेडिट कार्ड खातेदाराला कार्ड बंद झाल्याची माहिती ईमेल, एसएमएसद्वारे द्यावी लागेल.
बातमी वाचा- UPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या
बँक किंवा एनबीएफसीला क्रेडिट कार्ड खातेदाराचा अर्ज 7 दिवसात स्वीकारावा लागणार आहे. जर अर्ज स्वीकारला नाही तर बँकांना त्या संबंधित खातेदाराला दिवसाचे 500 रुपये दंड द्यावा लागेल. आरबीआयचा हा नियम शेड्युल बँक आणि एनबीएफसीला लागू आहे.