मुंबई : सध्या महागाई इतकी वाढत आहे की, आहे त्या पगारात घर चावने सर्वसामान्यांना कठीण झालं आहे. खाण्याच्या वस्तूपासून ते इतर सर्वच सर्विस रिलेटेड वस्तूंचे देखील भाव गगनाला भिडले आहेत. ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपला एक-एक रुपया वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. खरंतर यामुळे सर्व सामान्यांना रेस्टॉरंटमध्ये जाणं देखील कठीण होऊन बसलं आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, रेस्टॉरंट मालक तुमच्याकडून बऱ्याचदा जास्तीचे पैसे घेतात. जे देणं तुम्ही टाळू शकता आणि यामुळे तुमच्या बिलाची रक्कम  देखील कमी होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर हे रेस्टॉरंट मालक बिलाच्या शेवटी जीएसटीसह आपल्याला सर्विस टॅक्स लावतात. जे आपल्या लक्षातच येत नाही. बऱ्याच रेस्टॉरंटचा सर्विस चार्ज खूपच जास्त असतो. तुम्ही जर तो देणं टाळलात, तर तुमचं बिल फारच कमी होऊ शकतं.


अशा प्रकारे कापले जातात खिसे


देशातील कोणत्याही सामान्य रेस्टॉरंटमध्ये आपण जेवण घेतले तर आपल्याला त्यावर 5 टक्के जीएसटी भरावी लागते. जर रेस्टॉरंट एखाद्या हॉटेलमध्ये असेल, ज्याचे खोलीचे दर रु. 7500 पेक्षा जास्त असतील तर आपल्याला 18 टक्के GST भरावा लागेल. त्यामुळे सरकारी नियमानुसार ही रक्कम बिलाच्या व्यतिरिक्त देणे बंधनकारक आहे.


परंतु बऱ्याचदा रेस्टॉरंट चालक ग्राहकांच्या माहितीच्या अभावाचा फायदा घेतात आणि सर्विस चार्जेसचे स्वतंत्रपणे उल्लेख करतात. हे बिलाच्या तळाशी लिहिलेले आहे. परंतु तुम्हाला माहितीय का, की ग्राहकांना सर्विस चार्जेस भरणे बंधनकारक नाही, ते पूर्णपणे ऐच्छिक आहे, ग्राहकांना जर ते भरायचे नसेल, तर ते त्यासाठी नकार देऊ शकतात. परंतु तरी देखील रेस्टॉरंट चालक तुम्हाला ते भरण्यासाठी सक्ती करत असतील. तर तुम्ही त्या विरोधात तक्रार दाखल करु शकता.



सर्विस चार्जेस काय आहेत? हे समजून घेऊ या


रेस्टॉरंट्स त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्विस चार्जेस आकारतात, म्हणजेच एक प्रकारे, रेस्टॉरंटच्या सेवेवर आनंदी राहून तुम्हाला ही टीप त्यांना द्यायची आहे. परंतु सध्या बऱ्याच रेस्टॉरंट चालकांनी ते अनिवार्य केले आहे. परंतु हे लक्षात घ्या की, ते ऐच्छिक आहे. तुमची इच्छा असेल, तर ते तुम्ही देऊ शकता. तसेच जर तुम्ही सर्विस चार्जेस भरलेत, तर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये वेटरला टीप देण्याची गरज नाही.


सर्विस टॅक्स आणि सर्विस चार्जेस यांच्यातील फरक काय?


सरकारकडून आकारला जाणारा कर हा सर्विस टॅक्स असतो आणि रेस्टॉरंट ऑपरेटर तो ग्राहकांकडून घेतो. व्हॅटच्या जमान्यात तो स्वतंत्रपणे आकारला जात होता, परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर सर्व कर एकामध्ये विलीन केले गेले आहेत आणि ते भरणे बंधनकारक आहे.


तर सर्व्हिस चार्ज हा एक प्रकारे रेस्टॉरंटच्या सेवेवर आनंदी झाल्यानंतर ग्राहकाने दिलेली टीप आहे, परंतु ते अनिवार्य नाही.