Safety Pin च्या नावामागची रंजक कथा? गोष्ट खूपच रोमांचक
सेफ्टी पिन हे नाव नेमकं पडलं कसं?
मुंबई : Safety Pin Story: सेफ्टी पिनच्या नावाशी 'सेफ्टी' जोडली गेलेली आहे. अनेकजण याचा वापर सुरक्षेपेक्षा इतर गोष्टींसाठी अधिक करतो. अगदी दात साफ करण्यासाठी, अचानक कपडे फाटल्यावर ते जोडण्याकरता अथवा बटण म्हणून सेफ्टी पिनचा वापर केला जातो.
एका छोट्या तारेच्या तुकड्याचा खूप वापर होतो. मात्र या सेफ्टी पिनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? याच्या नावामागची गोष्ट काय आहे. दररोजच्या वापरातील ही गोष्ट का आहे इतकी महत्वाची?
वॉल्टर हंटचा कमाल?
सेफ्टी पिनचा शोध हा वॉल्टर हंटने केला होता. वॉल्टर हंट अशाच छोट्या छोट्या गोष्टींकरता ओळखले जातात. एकेकाळी त्यांच्यावर खूप कर्ज होतं. ते कर्ज कमी करण्यासाठी ते अशा छोट्या छोट्या गोष्टींचा शोध लावत होते.
असाच सेफ्टी पिनचा देखील शोध लागला. सेफ्टी पिनचे पेटंट घेऊन ते ४०० डॉलला विकण्यात आले होते.
सेफ्टी पिनसोबत त्यांनी पेन, स्टोन, चाकू यासारख्या धारधार गोष्टींचा देखील शोध वॉल्टर हंट यांनी लावला आहे.
एवढंच नव्हे तर शिलाई मशीनचा शोध देखील वॉल्टर हंट यांनी लावला आहे.
गरज ही शोधाची जननी, पत्नीला खूष करताना लागला सेफ्टी पिनचा शोध
पत्नीच्या ड्रेसमधील बटण तुटले होते. त्यावेळी वॉल्टरने काम करणाऱ्या वायरने चकरा मारल्या होत्या.
त्याने ही सेफ्टी पिन वायरपासूनच बनवली ज्याला ड्रेस पिन म्हणतात. त्याचे खरे नाव ड्रेस पिन आहे.
बदलत्या काळातही तिची उपयुक्तता कमी न झाल्याने तिच्या डिझाइनमध्ये छेडछाड न करता ती बनवणाऱ्या कंपन्यांनी महिलांच्या साडीच्या रंगानुसार ती रंगीबेरंगी केली.
यासाठी सेफ्टी पिन असं नाव
असं म्हटलं जातं की, हंट यांच्या शोधानंतर तारेच्या जागी या पिनचा वापर करण्यात आला. या पिनमुळे लोकांची बोटे सुरक्षित आहेत. त्यामुळेच या पिनला सेफ्टी पिन असं म्हटलं जातं.