मुंबई : रविवार हा सुट्टीचा वार मानण्याचा संस्कार आपल्या प्रत्येकावर अगदी बालपणापासूनच होतो. म्हणजे शाळेत नंतर कॉलेजमध्ये असताना सुट्टी म्हटलं की रविवार. पुढे कामावर रूजू झाल्यावर रविवारी हा सुट्टीचा वार म्हणून सोबत राहिला. तुमचा आठवड्यातील आवडता वार कोणता? असा प्रश्न विचारल्यास अगदी क्षणाचाही विलंब न करता प्रत्येकजण "रविवार...." असं मोठ्याने ओरडून सांगेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण धावपळीच्या या जगात कुटुंबासोबत दिवस घालवायचा म्हणजे 'रविवार' या दिवशी घरी राहायचं असंच समीकरण अनेकांच असतं. रविवार म्हणजे सुट्टीचा, कुटुंबाचा आणि खास करून आरामाचा दिवस मानला जातो. जरी आता आपल्या कॉर्पोरेट सेक्टरचं प्रमाण वाढत असलं आणि रविवारची सुट्टी आता मधल्यावारी मिळत असली तरीही आपल्या प्रत्येकावर रविवारच्या सुट्टीचाच संस्कार झालेला आहे. पण ही रविवारची सुट्टी कधी आणि कुणामुळे सुरू झाली याची माहिती आपल्याला आहे का?


आजच्या दिवशी सुरू झाली रविवारची सु्ट्टी 


रविवारची सुट्टी 10 जून 1890 रोजी सुरू झाली. भारतीयांना रविवारची पहिली सुट्टी या दिवशी मिळाली. आपली रविवारची ही पहिली सुट्टी आता 125 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 


यांच्यामुळे सुरू झाली ही सुट्टी 


अठराशेच्या शतकात जरी इंग्रजांचे राज्य असले तरीही एका मराठमोळ्या व्यक्तीने या सुट्टीला सुरूवात केली आहे. नारायण मेघाची लोखंडे या मराठी माणसाने तब्बल 6 वर्षे संघर्ष केल्यामुळे आपल्याला ही सुट्टी मिळाली आहे. 


रविवारच्या सुट्टीचा इतिहास 


भारतात पहिल्या सुट्या अशा नव्हत्या. पण शनिवारी तेल आणू नये आणि सोमवारी कटिंग करू नये असे मानले जात असेत. या मान्यतेनुसार रविवार हा दिवस सुट्टीचा दिवस ठरला. इंग्रजांच्या काळात महिला आणि प्रोढ कामगारांसाठी सुट्टी अशी तरतूद नव्हती. तेव्हा रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिला आवाज उठवला. लोखंडे यांनी या प्रकरणात आंदोलन सुरूच ठेवले. तेव्हा 10 हजार कामगारांच्या साथीचे 24 एप्रिल 1890 रोजी सभा घेतली. आणि आंदोलन यशस्वी झाले तेव्हा 10 जून 1890 रोजी 'रविवार' ही पहिली साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली.