मुंबई : तामिळनाडूतील कुन्नूरच्या निलगिरी जंगलात भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर अपघातानंतरचे दृश्य खूपच वेदनादायी होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बचावकर्त्यांनी हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यात सीडीएस जनरल बिपिन रावतही होते. बचाव पथकाचे सदस्य जनरल रावत यांना बाहेर काढत असताना त्यांनी हळूच त्यांचे नाव उघड केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाचे सदस्य एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत वाचवले आहे. ज्यामध्ये जनरल रावतही होते. त्यांनी सांगितले की सीडीएसने त्यांचे नाव हिंदीत संथ आवाजात सांगितले. मी जनरल बिपिन आहे. बचावकर्ते त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेले. मात्र शरीराच्या खालच्या भागात खोलवर जखमा झाल्याने देशाचा हा शूर सुपुत्र कायमचा निघून गेला.


ते म्हणाले की, जनरल रावत यांच्या शरीराचा खालचा भाग गंभीरपणे जळाला असून अनेक जखमा आहेत. त्यांना बेडशीटमध्ये गुंडाळून आम्ही अॅम्ब्युलन्समध्ये नेले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


घटनास्थळी भेट दिलेल्या निलगिरीमधील आरोग्य सेवांचे सहसंचालक डॉ. एस पलानीसामी यांनी सांगितले की, बहुतेक मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते.