मुंबई : प्रत्येकजण आपली कमाई वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. तुमच्या स्मार्ट स्ट्रॅटेजी आणि ज्ञानाने हे शक्य होतं. असेच एक व्यक्ती आहेत मोतीलाल ओसवाल फायनेंशिअल सर्व्हिसेसचे संस्थापक एम डी रामदेव अग्रवाल त्यांनी वेल्थ क्रिएशन स्टडी (wealth creation studies)तयार केली आहे. त्यांनी वेल्थ क्रिएशनचा परफेक्ट फार्मुला Zee Mediaशी शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिंडी इफेक्ट फॉ़र्मुला
एखादी गोष्ट जेवढी जुनी असेल ती चालण्याची शक्यता जास्त असते. कंपनीची कन्सेप्ट २५ ते ३० वर्ष चालायला हवी. कंपनीच्या निवडीवरून ठरतं की, तुमची गुंतवणूक दीर्घ काळ रिटर्न देणारी आहे की नाही.


लोभ करू नका, चांगल्या कंपनीची निवड करा
बाजारात जास्त रिटर्नचा लोभ अनेकजण ठेवतात. लवकरात लवकर पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात नुकसान होऊ शकते. त्यापेक्षा विश्वासाहार्य कंपन्या निवडा त्यांच्यात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी चांगला परतावा देऊ शकते.


एखादा स्टॉक दुप्पट होणे आणि परतावा मिळणे
एखादा स्टॉक ४-५ वर्षांनी दुप्पट होणे शक्य असते. त्यामुळे अशा चांगल्या कंपनींच्या स्टॉकमधून 14 ते १५ टक्के परताव्याची आशा ठेवायला हरकत नाही.


ड्युपॉन्ट ऍनालिसिस
उद्योगामध्ये मार्जिन, लिवरेज आणि ऍसेट टर्न यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. या तिघांना ड्युपॉन्ट ऍनालिसिस असे नाव देण्यात आले आहे. वर्षाच्या सुरूवातीला केलेली गुंतवणूक वर्षाच्या शेवटी किती परतावा देत आहे. हे तपासा. चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा देऊ शकतात. 


कंपनी निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा
कंपनी निवडताना लक्ष द्या की, कंपनीची स्पर्धा असलेल्या कोणत्या इतर कंपन्यांशी कंपनीचा कोणता तंटा वेगैरे नाही ना! ज्या इंडस्ट्रत कलह आहे तिथे पैसा बनू शकत नाही.