मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या दरात खूप वाढ पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात तर सोन्याने प्रति 10 ग्रॅमला 40 हजार रुपयांचा आकडा गाठला होता. आतापर्यंत सोन्याची किंमत एवढी नव्हती मात्र आता हे दर कमी होण्याचं नावच घेत नाहीत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. भौगोलिक परिणाम 
इराण आणि अमेरिकेच्या वादामुळे खाडी क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चेतावणी दिली आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न केला तर ते धोक्याचं ठरेल. कारण अमेरिकेने इराणच्या 52 ठिकाणांना निशान्यावर घेतला आहे. तसेच उत्तर कोरियाने अण्विक परिक्षण पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली आहे. या सगळ्या भौगोलिक तणावाचा परिणाम देखील सोन्याच्या दरावर पाहायला मिळतो. 


2. ग्लोबल अर्थव्यवस्था
अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून व्यावसायिक दृष्टीकोनातून ताण तणाव सुरू आहे. याचा परिणाम ग्लोबल अर्थव्यवस्थेवर होत असून विकासाची गती मंदावली आहे. याच कारणामुळे 2019 मध्ये सोन्याचा दर सर्वाधिक वाढला.


3. व्याजदरात कपात 
वैश्विक स्तरावर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय बँकेद्वारे व्याज दरावर कपात केली आहे. डॉलरच्या दरात जी घसरण झाली त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर पाहायला मिळाला. डॉलरची घसरण सोन्याचे दर वाढवण्यास कारणीभूत ठरली. महत्वाचं म्हणजे डॉलरच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळणार आहे. 


4. चांगले रिटर्न 
गेल्यावर्षी 2019 मध्ये भारतात 23.77 टक्के आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक दारांना 18.28 टक्के रिटर्न मिळालं आहे. त्यामुळे या पिवळ्या धातूत म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार सज्ज असतात. 


5. दर वाढीचा ट्रेंड 
सोन्यात कायमच वाढ पाहायला मिळते. सोने दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणात वाढतच आहे. महत्वाचं म्हणजे पिवळ्या रंगाच्या या धातूत गेले अनेक वर्ष फक्त वाढचं पाहायला मिळत आहे. हा ट्रेंड जवळपास तीन चे चार वर्ष असतो.  


6. रुपयाच्या दरात घसरण 
भारतीय बाजाराबद्दल बोलायचं झालं तर रुपयांत घसरण पाहायला मिळत आहे. हे महत्वाचं कारण ज्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. देशात जेव्हा कधी सोन्याचा दर वाढतो त्याच्या खरेदीतही वाढ होते. तर किमती खाली घसरल्या की इतर सगळ्या गोष्टींमध्ये घसरण पाहायला मिळते. 



7. गुंतवणूकीचे साधन 
जागेच्या खरेदारीमध्ये येणारे चढउतार आणि इक्विटीमधील अनिश्चितता याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. गुंतणूकदार सोन्याच्या दरात गुंतवणूक करताना पाहायला मिळतात.