मुंबई : हायप्रोफाईल भक्तांचे अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या बातमीनं अनेकांना धक्का बसलाय. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. 


वैवाहिक जीवनात तणावाचं वातावरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरापूर्वीच भय्यू महाराज दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले होते. ३० एप्रिल २०१७ रोजी ग्वालियर स्थित डॉ. आयुषी शर्मा हिच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला होता. आई आणि मुलीच्या काळजीपोटी आपण दुसरा विवाह करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दुसऱ्या विवाहानंतर त्यांच्या घरात तणावाचं वातावरण असल्याचं सांगण्यात येतंय. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं आधीच निधन झालं होतं. त्यांना एक मुलगीही आहे  


भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडली त्यावेळी घरात त्यांची आई आणि नोकर उपस्थित असल्याचं समजतंय. 


कौटुंबिक कलह


भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचं कारणही चर्चेत आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.  


कर्जाला कंटाळून आत्महत्या?


९० च्या दशकात 'सियाराम' कपड्यांसाठी मॉडेलिंग करणाऱ्या महागड्या घड्याळांची आणि कपड्यांची आवड होती... भय्यूजी महाराजांचा आश्रम इंदौरस्थित आहे. ते केवळ सफेद रंगाची मर्सिडिज एसयूव्हीमधूनच प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते महागड्या हॉटेलांतच उतरत होते. राजनेते आणि व्यावसायिक यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अध्यात्माची आवड असणाऱ्या भय्यूजी महाराजांनी आश्रम उभारण्यासाठी कर्ज घेतलं होतं... कर्ज शकत नसल्यानंही ते निराशेत बुडाले होते, अशीही माहिती मिळतेय. कर्जबाजारीपणाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जातो.