मुंबई : कोरोनाकाळात बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन लागल्यामुळे लोकं घरीच आहेत. अशात लोकांना घरी करायला काही नसल्याने ते इंटरनेटवर काही ना काही सर्च असतात आणि आपले मनोरंजन करत असतात. तसा इंटरनेट हा आपल्याला स्वस्तात मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देतो. त्यामुळे लोकं सर्च करायचे थांबत नाहीत. गुगलवर सर्च करुन कोणी खाद्य पदार्थ बनवायला शिकतं असतात, तर कोणी माहिती घेत असतात. परंतु लोकं घरी बसुन इंटरनेटवर काय बरे शोधत असावे किंवा कोणता शब्द गुगलवर जास्त ट्रेंड करत आहे? हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये होम मेड केक, डालगोना कॉफी सारख्या गोष्टी गुगल ट्रेंडवर होत्या.(Google trend) परंतु या लॉकडाऊनमधून एक नवीन शब्द ट्रेंड करत असल्याचे समोर आले आहे.


आपल्या देशातील अनेक भागात 'फ्री पॉर्न' हा शब्द सगळ्यात जास्त गुगल केला जायचा. परंतु या लॉकडाऊन दरम्यान त्याचा ही रेकॉर्ड मोडला आहे. 'फ्री पॉर्न' चा ट्रेंडचा रेकॉर्ड मोडला आहे, तो ट्रेंड आहे 'शेअर बाजार'.


गुगल ट्रेंडमध्ये मागील पाच वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला, तर 2020 वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातील डेटा आणि या वर्षाच्या फेब्रुवारी आणि मेच्या दुसर्‍या आठवड्यातील डेटावरून हे समोर आले आहे. म्हणजेच या महिन्यांत गुगल ट्रेंडचा ग्राफ स्पष्टपणे दर्शवितो की, भारतीय लोकांमध्ये स्टॉक मार्केटचा कल खूप वाढत आहे. या महिन्यांत 'फ्री पॉर्न' हा ट्रेंडीग सर्च आता 'शेअर मार्केट'च्या खाली आला आहे.


हे घडले कारण सध्या कोरोनामुळे लोकांच्या पगारावर आणि कामावर परिणाम झाला आहे, त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून शेअर मार्केटकडे पाहिले जात आहे आणि त्यात पैसे इनवेस्ट करण्याच्या दृष्टीकोनातून या संबंधी योग्य माहिती घेण्यासाठी लोकं या बद्दल जाणून घेऊ लागले.


इतर राज्यांपेक्षा गुजरात आणि मिझोरममध्ये देशातील सर्वाधिक फ्री पॉर्न पाहिले जात आहे. मिझोरम सर्व राज्यांमध्ये फ्री पॉर्न सर्च करण्यात प्रथम क्रमांकावर आहे. मिझोरममध्ये 'फ्री पॉर्न' शोधण्याचे प्रमाण 96% आहे आणि 'स्टॉक ट्रेडिंग' शोधण्याचे प्रमाण केवळ 4 आहे.


गुजरातबद्दल बोलतांना, पश्चिम भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये फ्री पोर्नच्या संदर्भात अधिक सर्च केले गेले आहे. येथे 'फ्री पॉर्न' शोधण्याचे प्रमाण 76 आहे आणि 'स्टॉक ट्रेडिंग' शोधण्याचे प्रमाण केवळ 24 आहे.


परंतु जर कोणत्या राज्यात शेअर बाजार किंवा स्टॉकबद्द्ल सर्वात जास्त सर्च केले गेले? याचा विचार केला तर, महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे. महाराष्ट्रानंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्टॉक ट्रेडिंगबाबत सर्वाधिक दर दिसून आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केल्यास महाराष्ट्रातील या शब्दाचा शोध केलेला दर 100 टक्के आणि गुजरातमधील शोध दर 78 टक्के आहे.


कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये स्टॉक या शब्दाचा शोधण्याचे प्रमाण  94, 95 आणि 85 टक्के अनुक्रमे आहे. म्हणजेच स्टॉक ट्रेडिंगच्या बाबतीत गुजरात हा दक्षिण भारतीय राज्यांपेक्षा खूप मागे आहे.


एकंदरीत, हा डेटा दर्शवितो की, मागील वर्षापासून लोकांनी स्टॉक ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट आहे.