मुंबई : बऱ्याचदा आपल्या सोबत असं होतं की, आपण घाई-गडबडीत असतो, ज्यामुळे आपण ट्रेनमध्ये सामान विसरतो. त्यावेळी प्रवाशांना हा प्रश्न पडतो की, आता त्यांना त्यांचे सामान मिळेल की नाही? आणि तो मिळवायचा असेल, तर त्यांना काय करावं लागेल? परंतु हे लक्षात घ्या की, ट्रेनमध्ये विसरलेलं सामान तुम्ही पुन्हा मिळवू शकता. ही विसरलेली वस्तु किंवा सामान नक्की जातं तरी कुठे आणि ते कसं मिळवायचं यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.


ट्रेनमध्ये बॅग राहिली तर काय करावे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनमध्ये बॅग राहिली तर त्याच स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांसह आरपीएफ पोलिसांना कळवावे. यासाठी तुम्ही आरपीएफमध्ये एफआयआरही नोंदवू शकता. अशा परिस्थितीत, रेल्वे आणि पोलिसांची जबाबदारी आहे की, त्यांनी तुमचे सामान शोधण्याचा प्रयत्न करावा आणि तुमचे सामान तुमच्या नमूद सीटवर आढळल्यास ते जवळच्या आरपीएफ पोलिस ठाण्यात जमा केले जाते.


अनेक प्रकरणांमध्ये हे हरवलेले सामान पोलिस स्वत: स्टेशनवरती आणून ठेवतात, त्यावेळी प्रवाशांना त्यांची ओळख पटवून आणि कागदपत्रे दाखवून ते परत मिळवता येते.


अनेक स्थानकांवर घरपोच सामान पोहोचवण्याची व्यवस्थाही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपला माल परत मिळण्याची अपेक्षा खूप जास्त आहे.


रेल्वे तुमच्या सामानाचे काय करते?


तुमचे सामान ट्रेनमध्ये राहिल्यावर ते स्टेशनवर जमा केले जाते. रेल्वे कर्मचारी किंवा प्रवाशाने स्टेशनवर कोणाचे सामान घेतले तर स्टेशन मास्तर ते गोळा करतात. यानंतर, प्रक्रिया प्रत्येक आयटमच्या आधारे केली जाते. या वस्तूमध्ये दागिने वगैरे असल्यास ते २४ तास रेल्वे स्थानकावर ठेवले जाते. जर कोणी या वस्तूवर २४ तासांत हक्क सांगितला तर तो त्याला दिला जातो. अन्यथा ही वस्तू पुढील झोन कार्यालयात पाठवली जाते.


इतर वस्तूंसाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. रेल्वे अधिकारी ते तीन महिने त्यांच्याकडे ठेवतात आणि त्यानंतर ते पुढे पाठवले जातात. अनेक वस्तूंच्या विक्रीचे नियम देखील आहेत, जरी त्याची प्रक्रिया बरीच मोठी आहे. तसे, प्रत्येक वस्तूच्या आधारे वेगवेगळे नियम बनवले गेले आहेत आणि त्या नियमांनुसार तुमच्या मालाची विल्हेवाट लावली जाते.