मुंबई : आधारकार्ड असो की मतदार ओळखपत्र याकडे व्यक्तीची ओळख म्हणून पाहिले जाते. ही महत्त्वाची कागदपत्र मानली जाते. कारण ती कोणच्या हाती लागली तर त्याचा गैरवापर देखील केला जावू शकतो. त्यामुळे कोणत्या व्यक्तीचं जर निधन झाले असेल तर त्याच्या ओळखपत्रांचं काय केलं पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (What to do of documents if person dies?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात तुम्ही कुठे ही गेलात तर जवळ ओळखपत्र (Documents) बाळगावी लागतात. कारण कधी कुठे ही आपली ओळखपत्र मागितले जावू शकतात. एखादा जॉब मिळवायचा असो किंवा कोणतंही सरकारी काम असो सगळीकडे ओळखपत्र दाखवावीच लागतात.


आधार कार्ड (Aadhar card)


एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्या व्यक्तीचे आधार कार्ड तुम्ही लॉक करु शकतात. जेणेकरुन त्याचा गैरवापर होणार नाही. तसेच त्या व्यक्तीचे कोणत्याही योजनेत नाव असेल तर याबाबत ही माहिती दिली पाहिजे.


पॅनकार्ड (Pancard)


व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याचे पॅनकार्ड सरेंडर केले जाऊ शकते. कुटुंबिय आयकर विभागाच्या कार्यालयात जावून पॅनकार्ड जमा करु शकतात. पण त्याआधी त्या व्यक्तीच्या नावे असलेली सर्व खाती बंद करावीत.


मतदार ओळखपत्र (Voter Id)


एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-7 भरावा लागेल. त्यानंतर मतदार यादीतून त्यांचे नाव वगळले जाईल. फॉर्म7 भरताना सोबत मृत्यू दाखला जोडावा लागतो.


पासपोर्ट (What to do of passport if person dies?)


मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करण्याची सध्या तरी  कोणतीही व्यवस्था नाही. पण काही काळानंतर व्यक्तीचे पासपोर्ट रिन्यू केले नाही तर रद्द केले जाते.