`Power Of Attorney` किती प्रकारची असते? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
पॉवर ऑफ अॅटर्नी हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे. या माध्यमातून एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.
Power Of Attorney: पॉवर ऑफ अॅटर्नी हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे. या माध्यमातून एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते. पॉवर ऑफ अॅटर्नी अंतर्गत नियुक्त केलेल्या व्यक्तीला प्रिन्सिपल, डोनर किंवा ग्रांटर म्हंटलं जातं. अधिकृत व्यक्तीला एजंट किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी एजंट म्हणतात. अटी व शर्तींच्या आधारे, अधिकृत एजंटला मालमत्तेबाबत कायदेशीर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पॉवर ऑफ अॅटर्नी निवडणे थोडे कठीण असू शकते, परंतु जर पात्रतेचा विचार केला तर ती व्यक्ती जबाबदार, विश्वासार्ह, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि निर्णय घेण्यात सक्षम असावी. नियुक्त केलेल्या जबाबदारीनुसार 4 प्रकारचे POAs असू शकतात
पॉवर ऑफ अॅटर्नीचे प्रकार
1. कन्वेंशनल पॉवर ऑफ अॅटर्नी- जबाबदारीच्या आधारावर व्यक्तीला जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी (GPA) असेही म्हणतात. या अंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केवळ एका विशिष्ट जबाबदारीसाठी आणि एका निश्चित वेळेसाठी वैध असते.
2. ड्यूरेबल पॉवर ऑफ अॅटर्नी- ड्यूरेबल पॉवर ऑफ अॅटर्नी आयुष्यभरासाठी असते. परवानगी देणारा व्यक्ती अनफिट असल्यास एजंटला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परवानगी देणाऱ्याचा मृत्यू किंवा त्याच्याकडून प्लान रद्द होईपर्यंत असे POA चालू ठेवले जातात. उदाहरणार्थ, अनुदान देणारा त्याच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी एजंट नियुक्त करू शकतो.
3. स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अॅटर्नी- स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अॅटर्नी विशिष्ट कार्यक्रम, तारीख किंवा स्थितीसाठी वापरली जाते. विशेषत: जेव्हा अनुमती देणारा निर्णय घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, निवृत्त लष्करी व्यक्ती अपंग असल्यास POA एजंट नियुक्त करू शकते.
IT Sector ला येणार अच्छे दिन! शेअर बाजार तज्ज्ञांनं सांगितलं यामागचं कारण
4. मेडिकल पॉवर ऑफ अॅटर्नी- मेडिकल पॉवर ऑफ अॅटर्नी ही स्प्रिंगिंग आणि ड्युरेबल पॉवर ऑफ अॅटर्नीच्या अंतर्गत येते. ही पॉवर सामान्यतः आरोग्यसेवेशी संबंधित बाबींमध्ये वापरले जाते. परंतु ही नियुक्ती करण्यासाठी, व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित असणे आवश्यक आहे.