Bangladesh Voilence: बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे  हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात आश्रयासाठी आल्या. या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवरील राजकारण ढवळून निघालं. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना यासंबंधित महत्त्वाचे प्रश्न विचारले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल यांनी परराष्ट्र मंत्र्यांना तीन प्रश्नांची विचारणा केली. बांगलादेशमधील ढाकामध्ये झालेल्या हिंसाचाराचा आणि सत्तांतरणाचा भारताच्या राजकीय बाबींवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे या सगळ्यावर सरकारची रणनिती काय ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना विचारला. त्यावर एस. जयशंकर यांनी सांगितले की, या संवेदनशील आणि तणावपूर्ण घटनांचं गांभीर्य लक्षात घेत केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय हलचालींवर बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. 


त्यानंतर राहुल यांनी एस. जयशंकर यांनी दुसरा प्रश्न विचारला,  गेल्या काही दिवसांपासून ढाकामध्ये  हिंसाचार होत आहे. हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी परकीय राष्ट्र विशेषत: पाकिस्तानचा हस्तक्षेप असू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? राहुल यांच्या प्रश्वाला उत्तर देत एस. जयशंकर म्हणाले की, या सगळ्या दृष्टीकोनातून केंद्र सरकार तपास करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेश हिंसाचाराचा फायदा पाकिस्तान घेत आहे का?  पाकिस्तानच्या सोशल मीडियावरुन हिंसाचाराचे व्हिडीओ पोस्ट करण्यावर केंद्र सरकारची करडी नजर आहे. 


या  तणावपूर्ण वातावरणाचे भविष्यात काय पडसाद उमटले जातील याचा केंद्र सरकाला अंदाज आहे का? राहुल  यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, सदर परिस्ठितीचं गांभीर्य लक्षात घेऊनच केंद्र सरकारकडून योग्य ती पाऊलं उचलली जातील. दरम्यान ही सगळी संवेदनशील परिस्ठिती लक्षात घेत, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकरला पाठिंबा दर्शवला आहे. अशी पोस्ट परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी X वर केली आहे.  "बांगलादेशातील चालू घडामोडींबद्दल आज संसदेत सर्वपक्षीय बैठकीत काही मुद्दे मांडण्यात आले, त्यावर सर्व पक्षांनी  एकमताने पाठिंबा दिला आहे.असे त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले. 


 




बांगलादेशातील झालेल्या हिंसावराने पंतप्रधान पादाचा राजीनामा देत हसिना यांनी पलायन केले. आश्रयासाठी सध्या त्या भारतात असल्या तरी येत्या काही दिवसांत हसीना यूकेला जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या हसीना नवी दिल्लीत राहत असून त्याचं पुढील धोरण काय आहे, याबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. बांगलादेशमध्ये सुमारे 20,000 भारतीय नागरिकांच वास्तव्य आहे, त्यातील 8,000 भारतीय सुखरुपणे मायदेशी परतले आहे. केंद्र सरकार तेथील भारतीयांच्या संपर्कात असून हल्ल्याचा पाठपुरावा करण्यात प्रयत्नशील आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीनंतर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, बांगलादेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सीमाभागातील  परिस्ठिती ही चिंतेची बाब आहे. मात्र केंद्र सरकार यावर ठोस पाऊलं नक्कीच उचलतील यावर विश्वास आहे आणि म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी मोदी सकरला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.