नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळे ६०० रुपयांनी तर चांदी च्या दरात प्रतिकिलो २ हजार रुपयांची वाढ झाली आहे.  सोन्याचे आजचे दर ५ १ हजार प्रतितोळे तर चांदी ६२ हजार प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान येत्या दिवसात येणाऱ्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर कमी होणार का ? दिवाळीपर्यंत १० ग्राम सोन्याचा दर काय असेल ? असे प्रश्न विचारले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. सध्या बाजारातील व्यवहार स्थिर आहे. हळूहळू शेअर बाजार पूर्वपदावर येऊ लागलाय. कमोडीटी बाजारात चांगला व्यापार होऊ लागलाय. ३० सप्टेंबरपर्यंत सोनं प्रति १० तोळं ५ हजार ६८४ तर चांदी १६ हजार ०३४ स्वस्त झाली आहे.



दिवाळीपर्यंत चढउतार 


जर तुम्हाला वाटत असेल दिवाळीपर्यंत सोन स्वस्त होईल तर ते चूक ठरु शकतो असे मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्विसचे कमोडीटी वॉइस प्रेसिडेंट नवनीत दमानी यांनी सांगितले. सोन्याचा दर उंचावरुन खाली येत ५० हजारपर्यंत आलाय. तर चांदी ६० हजारांच्या घरात आहे. येणाऱ्या काळातही हा चढउतार सुरु असेल. दिवाळीपर्यंत सोनं ५० ते ५२ हजार प्रति १० ग्रामच्या रेंजमध्ये असेल असे सांगितले जातंय. 


रुपया मजबूत 


गेल्या दोन महिन्यात रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट दिसून येतेय. रुपया सध्या ७३ ते ७४ रुपये प्रति डॉलर आहे. कोरोना प्रादुर्भावापासून तो ७८ रुपये प्रति डॉलर पोहोचला होता. डॉलरमध्ये तेजी आली तर सोन्याचे दर वेगाने वाढतील. पुढच्या वर्षीपर्यंत सोनं ६० ते ७० हजार प्रति १० ग्रामपर्यंत पोहोचू शकते. 


आता जगभरात लॉकडाऊननंतर अनलॉकला सुरुवात झालीय. सर्वच देश अर्थव्यवस्था मजबूत करण्यास लागले आहेत. पुढच्या वर्षापर्यंत डॉलर मजबूत होण्यासोबत सोन्याच्या दरात अचानक उसळी पाहायला मिळू शकते असे विशेतज्ञ सांगतात.