नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर प्रथम महिला मंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील पहिला सादर केला. या अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेल, सोने, काजू या वस्तू महागणार आहेत. सोने महागणार आहे कारण सोन्यावरची कस्टम ड्युटी साडेबारा टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्यच्या दरात वाढ होणार आहे.


Union Budget 2019  :  सोने, पेट्रोल-डिझेल महागणार, आयकरसाठी 'आधार' पुरेसे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पेट्रोल आणि डिझेल या इंधनावरील सीमा शुल्कामध्ये एक रुपया प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. तसेचर सोने आयात शुल्क कर १० टक्क्यांवरुन थेट १२.५ टक्के एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे सोने यावरील टॅक्स हा थेट २.५ टक्के वाढला आहे. त्यामुळे सोने खरेदी महागणार आहे. त्यामुळे सोने दर प्रति तोळा ३५ हजारांच्या घरात पोहोचणार आहे. तसेच सोने याबरोबरच चांदी महागणार आहे. तर तंबाखूजन्य वस्तूही या अर्थसंकल्पानंतर महागणार आहेत. 



केंद्र सरकारने आयात शुल्क करामध्येवाढ केली आहे. त्यामुळे काही वस्तू महागल्या आहेत. आयात पुस्तकांवर पाच टक्के शुल्क लागणार आहे. ऑटो पॉर्ट्स, सिथेंटिक रबर, पीव्हीसी, टाइल्स या वस्तू देखील महाग होणार आहेत. सीमा शुल्कवाढ केल्यामुळे पेट्रोल-डिझेल, सोनं-चांदी, काजू हे महाग झाले आहेत. 


सोन्याशिवाय चांदी आणि चांदीचे दागिने खरेदी करताना अतिरिक्त रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोने खरेदीवर १३ टक्के टॅक्स लागतो. यात १० टक्के आयात कर आणि ३ टक्के जीएसटी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सराफ व्यापाऱ्यांना हा धक्का बसला आहे. आता १२.५ आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटी असा एकूण १५.५ टक्के टॅक्स सोन्यावर द्यावा लागणार आहे. 


श्रीमंतांसाठी करदर वाढवला


केंद्र सरकारने अर्थसंकल्पात श्रीमंतांवरचा कर दर वाढवाला आहे. २ ते ७ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्नांवर सरकारने क रदर वाढवला आहे. २ ते ७ कोटी वर्षांचे उत्पन्नावरचा कर वाढणार असून आता ३ टक्के सरचार्ज द्यावा लागणार आहे.