Union Budget 2019 : सोने, पेट्रोल-डिझेल महागणार, आयकरसाठी 'आधार' पुरेसे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिला अर्थसंकल्प.

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 5, 2019, 06:12 PM IST
Union Budget 2019 :  सोने, पेट्रोल-डिझेल महागणार, आयकरसाठी 'आधार' पुरेसे title=

सोने - पेट्रोल महागणार

- सोने, मौल्यवान वस्तू महागणार, सीमाशुल्कात २ टक्के वाढ
- पेट्रोल, डिझेलच्या दरात होणार वाढ, १ रुपया उत्पादन शुल्क वाढविले

आयकर भरण्यासाठी 'आधार' पुरेसे

- आयकर भरण्यासाठी पॅन नसल्यास आधार कार्ड पुरेसे
- डायरेक्ट टॅक्सेस ७८ टक्क्यांपर्यंत वाढ
- केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही वाढ ७८ टक्क्यांपर्यंत झाली आहे. 
- गेल्या पाच वर्षात सामान्य माणसांवरचा कराचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न 
- गेल्या दोन वर्षांमध्ये थेट करांच्या प्रमाणात ६.३८ लाख कोटी रुपयांवरून ११.३७ लाख कोटी रुपये 

कॉर्पोरेट टॅक्स 

- पर्यावरणाशी संबंधित उद्योगांना करसवलत 
- येत्या काही वर्षात भारत हा देश इलेट्रिक वाहनांचे केंद्र झाला पाहिजे
- जीएसटी परिषदेकडे आम्ही या वाहनांवरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणावा अशी शिफारस केलेय
- ज्या कंपन्यांची  वार्षिक आर्थिक उलाढाल ४०० कोटींपर्यंत आहे त्यांना २५ टक्के कर,  आधी ही मर्यादा २५० कोटीपर्यंत होती 
- कॉर्पोरेट टॅक्स २५ % असणार, ४०० कोटी रुपयांच्या खाली टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांना फक्त २५ टक्के टॅक्स
- वीजेवर चालणाऱ्या गाड्या घेणाऱ्यांसाठी गाडीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजापोटी भरलेली दीड लाखांपर्यंतची रक्कम करप्राप्त उत्पन्नातून वजा करण्यात येईल

अनिवासी भारतीयांना आधार कार्ड

- भारतात आल्यावर अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार
-  देशाची बौद्धिक संपत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणार
- २०२० पर्यंत वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष्य
- प्रत्यक्ष कर वसुली ७८ टक्क्यांपर्यंत वाढली
- १, २, ५, १० आणि २० रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात येणार

- सरकारी कंपन्यांमधील समभागांची एक लाख कोटींपेक्षा अधिकची निर्गुंतवणूक
- महिला उद्योजकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी देशातील जिल्ह्या- जिल्ह्यात महिला बचत गट स्थापन करण्यावर भर देणार.

एलईडी बल्बमुळे देशाचा फायदा, १८३४० कोटी रुपयांची बचत झाली
- रेल्वे स्टेशन्सच्या आधुनिकरणासाठी नवी योजना सुरू
- कामगारांसाठी आणखी चार न्यायालये तयार केली जातील

नारी तू नारायणी

- महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती आहे.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला भागदीरी सोनेरी अध्याय 
- महिलांच्या नेतृत्वात उद्योगात भरारी
- आमचे सरकार नारायणीच्या तत्त्वावर महिलांवर चालत आहे.
- महिलांची स्थिती सुधारण्यावर सरकारचा जोर आहे.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका महत्वाची आहे.
- मुद्रा योजनेत एक लाखांपर्यंत महिलांसाठी कर्ज सुविधा

कौशल्य विकासावर भर

- बस्ववेश्वरांच्या विचारांवर चालणारे सरकार
- कौशल्य विकासावर मोठा भर देणार
- तरुणांना परदेशी भाषा शिक्षण देण्याचा प्रयत्न
- तरुणांना इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचे शिक्षण देणार

खेळो इंडिया योजना 

- खेळो इंडिया योजनेला आणखी निधी देणार
- राष्ट्रीय खेळ बोर्ड स्थापन करणार 

कामगार क्षेत्रासाठी

- कामगार क्षेत्रासाठी चार नवे कामगार कोड
- स्टँड अप इंडिया योजना २०२५ पर्यंत सुरू ठेवणार
- योजनेअंतर्गत एससी, एसटी समाजात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना

- मेट्रो रेल्वेवर भर
- गांधीपिडीया तयार करण्यात येत आहे
- नवे शैक्षणिक धोरण आणणार

राष्ट्रीय संशोधन केंद्र

राष्ट्रीय संशोधन केंद्र संशोधनावर भर 
सगळ्या मंत्रालयांमधील संशोधनासाठी दिले जाणारे निधी एकत्र करणार
राष्ट्रीय संशोधन केंद्रातही स्वतःचा  वेगळा निधी असेल

स्वच्छ भारत

- स्वच्छ भारत अभियानाने जनेतेचे हृदयचा ठाव घेतला
- ९ कोटी शौचलयं उभारण्यात आली आहेत
स्वच्छ भारत मोहिमेतच घनकचरा व्यवस्थापनाचा मंत्र 

डिजिटल साक्षर

- २ कोटी लोकांना डिजिटल साक्षर करण्यात आले आहे
- भारत नेट अंतर्गत देशातली प्रत्येक ग्रामपंचायत जोडली जात आहे.

झीरो बजेट शेती

- झीरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे
- ग्रामीण उद्योग क्षेत्रात क्लटर डेव्हलपमेंट आणणार, 
- अन्नदात्याला उर्जादाता बनवण्यासाठी नव्या योजना
- त्यातूनच २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल
- शेतकऱ्यांनी डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण केलं. त्याबद्दल अभिनंदन
- आता तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनण्याची वेळ आलीय

जलजीवन योजना

- जलशक्ती मंत्रायलायची या कार्यात महत्वाची भूमिका
- राज्यांच्या मदतीनं हर घर जल योजना राबवणार
- जलजीवन योजना २०२४ पर्यंत  अंमलात आणू

- मत्सउद्योगासाठी नवं धोरण तयार करणार
- पंतप्रधान ग्रामसडक ३ १ लाख २५ हजार किलोमीटरचे रस्ते अपग्रेड करणार ८० हजार कोटी खर्चाचा अंदाज

शेतकरी आणि गरीब केंद्रबिंदू

- गाव गरीब आणि शेतकरी आमच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू
- उज्ज्वला आणि सौभाग्य योजनेमुळे कोट्यवधी ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलला आहे.
- २०२२ प्रत्येक ग्रामीण भारतातील प्रत्येक घरात वीज आणि स्वच्छ अन्न शिजवण्याचा पर्याय उपलब्ध असेल

घरांचे स्वप्न पूर्ण करणार

- १.९५ कोटी घरे बांधून देणार
- २०१५-२०१६ मध्ये एक घर बांधण्यासाठी ३१४ दिवस लागत होते
- आज एक घर बांधण्यासाठी फक्त  ११४ दिवस लागत आहेत. त्यामुळे घरांचे स्वप्न पूर्ण होणार

विमा क्षेत्रात मोठे बदल

- विमा क्षेत्रातील इंटरमिटीडिअरीमध्ये १०० टक्के परदेशी गुंतवणूकीला परवानागी देणार
- सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूकीची मर्यादा वाढणार

- परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय
- एनआरआय पोर्टफोलिओ आता परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांमध्ये मर्ज करणार

 इस्त्रोच्या तंत्रज्ञानाचा फायदा

- इस्त्रोच्या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक फायदा घेण्यासाठी नवी कंपनी
- नवी कंपनी उपग्रह सोडण्यासाठीची यानं तयार करून परदेशात आपल्या तंत्रज्ञानचं मार्केटिंग करेल

उद्योगाचा नफा वाढवावा लागेल

- लघुउद्योगांसाठी वेगळी ऑनलाईन सुविधा सुरू करणार
- ३ कोटी छोट्या व्यापाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना

- लघु आणि मध्यम उद्योगासाठी ३५० कोटी रुपये देणार

- रेल्वेच्या सुविधांसाठी ५० कोटी

- रेल्वेत आदर्श भाडे योजना लागू करणार
- रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी ५० कोटी रुपये देणार
- रेल्वेत पीपीपी मॉडेल सुविधेवर भर देणार

- लघु आणि मध्यम उद्योगासाठी ३५० कोटी रुपये देणार
- सामाजिक संस्थानसाठी नवा शेअर बाजार उभारणार

- इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणार
- २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे टार्गेट

- राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थिक विकास ही सर्वात महत्वाची ध्येय
- पहिल्या कार्यकाळात मोदी सरकार नव्या भारताची मूहर्तमेढ रोवली
- २०१४- २०१९ या काळात अन्न सुरक्षेवरचा खर्च दुप्पट केला देशातला 
- मजूबत देशासाठी मजबूत नागरिक हे आमचं ध्येय आहे.
- पुढच्या पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं आमचं ध्येय
- याच वर्षी भारत ३ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल

नव्या भारतासाठी सरकारचा प्रयत्न

- भारतात पुढच्या काही वर्षात अर्थव्यस्थेत पायाभूत सुधारणा होतील
- पायाभूत सुविधा, डिजीटल इंडियामध्ये मोठी गुतंवणूक गरजेची
- पाच वर्षात १ ट्रिलियन डॉलरची भर पडली
- आपल्या नागरिकांची प्रगती इच्छा पाहिली. पाच ट्रिलियन डॉलरचं ध्येय  सहज शक्य आहे
- उद्योग देशाचे संपत्ती निर्माते आहेत

- आर्थिक विकास, राष्ट्रीय सुरक्षा ही दोन महत्वाची उद्दीष्ट
- नव्या भारतासाठी सरकारचा प्रयत्न राहणार

-  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या भाषणाला सुरुवात

-  केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक । संसदेत मंत्रिमंडळाची बैठक सुरू 

-  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसद भवनात दाखल 

- पंतप्रधान मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प. सकाळी ११.०० वाजता सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ करतील 

- केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट.

- शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण बाजार उघडताच ४० हजारांवर निफ्टी १२ हजारांजवळ

 - अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निघाल्यात. 

- अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी अर्थसंकल्प सादर होण्याआधी देवदर्शन घेतलं.

 
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी अकरा वाजता सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ करतील. लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. आता आज सादर होणाऱ्या 'पूर्ण अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष असून, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन कोणते निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे. 

- सरकारनं संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणात निवृत्तीचं वय 70 वर्षांवर नेण्याची शिफारस करण्यात आली आहे. सरकार याविषयी ताबडतोब काही निर्णय घेईल असं नाही,पण आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात याविषयी गांभीर्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील दशकात वाधर्क्याकडे झुकलेल्या नागरिकांच्या संख्येत जवळपास 97 लाख लोकांची भर पडेल असा अंदाज अर्थिक सर्वेक्षणानं व्यक्त केला आहे.