बंगळुरु : फक्त अडीच दिवसात कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडणारे 75 वर्षाचे बी.एस येदियुरप्पा आता राजकारणातून लांब जातील असं जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. मागे वळून पाहिलं तर कर्नाटकच्या राजकारणात भाजपचा झेंडा रोवणारे येदियुरप्पा राजकारणातील किती पक्के खेळाडू आहेत हे लक्षात येईल. याआधी 2007 नोव्हेंबरमध्ये देखील अशाच प्रकारे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यावेळी देखील फक्त सात दिवसासाठी ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. कोण दुसरा राजकारणी असता तर या घटनेनंतर तो व्यथीत झाला असतो किंवा निराश झाला असता. त्यानंतर 7 महिन्यानंतर मे 2008 मध्ये पुन्हा भाजपला बहुमत मिळवत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक संयोग असा पण की त्यावेळी देखील त्यांना सात दिवसात जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांच्यामुळे खूर्ची सोडावी लागली होती. त्यावेळी येदियुरप्पा यांनी खूर्ची सोडल्यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागलं होतं. 7 दिवस मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले त्यांच्यामध्ये कोणी नाही आलं. जेव्हा दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. तीन वर्षानंतर त्यांना खूर्ची सोडावी लागली. त्यांची परीक्षा येथेच नाही संपली. यानंतर भाजप देखील त्यांच्या मागे लागला. यानंतर त्यांनी आपला दुसरा पक्ष स्थापन केला.


2013 विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका भाजपला बसला. यावेळी देखील आता येदियुरप्पा यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात आलं आहे अशा चर्चा होत्या. पण लगेचच त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वासच नाही तर 2018 कर्नाटक निवडणुकीची कमान देखील आपल्या हातात घेतली. या निवडणुकीत भाजप सत्तेपासून थोडा लांब राहिला. यंदा ही 7 जागांमुळे त्यांना पूर्ण बहुमत नाही मिळू शकलं. पण पक्ष 104 जागांपर्यंत पोहोचली.


येदियुरप्पा यांनी 2018, 2008 आणि 2004 विधानसभा निवडणुकीत भाजपला नंबर 1 चा पक्ष बनवला. येदियुरप्पा यांनी 2004 विधानसभेमध्ये आधी काँग्रेसच्या धरम सिंह आणि नंतर जेडीएसच्या कुमारस्वामी सरकारला खाली पाडलं. येदियुरप्पा आता देखील शांत बसणार नाहीत. त्यांची पुढची चाल काय असेल हे पाहावं लागेल.