हॉटेलच्या रुममधून या वस्तू बिंधास्त घरी घेऊन जा, कोणी काहीच बोलणार नाही, फक्त रुम बुक करण्यापूर्वी ही यादी तपासा
हॉटेलची खोली सोडताना बऱ्याचदा लोकांच्या मनात असा विचार येतो की, हे उरलेलं सामान किंवा एखादी वस्तू आपण घेऊन जावे.
मुंबई : हॉटेलची खोली सोडताना बऱ्याचदा लोकांच्या मनात असा विचार येतो की, हे उरलेलं सामान किंवा एखादी वस्तू आपण घेऊन जावे. कधीकधी लोकं काही छोट्या छोट्या गोष्टी घरी घेऊनही येतात. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या बाली येथे एका हॉटेलमध्ये हॉटेलच्या खोलीतून चोरी करताना एक भारतीय कुटुंब पकडले गेले होते. हॉटेलने प्रसिद्ध केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर कुटुंबावर कडक टीका झाली.
त्यामुळे अशा प्रकरणानंतर, लोक वस्तू घरी नेताना विचार करत असतात. त्यांच्या ही मनात भिती असते की, आपण हे चूकीचे तर करत नाही ना? त्यामुळे तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, हॉटेलमधून कोणत्या प्रकारचे सामान तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि कोणते सामान घरी घेऊन जाऊ शकत नाही? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत.
हॉटेलच्या खोलीतून आपण कोणत्या प्रकारच्या वस्तू पूर्णपणे विनामूल्य घेऊ शकता?
1. पाण्याची बाटली: बरीच हॉटेल अतिथींनी कमीतकमी 2 बाटल्या पाण्यासाठी मोफत नि: शुल्क सेवा देतात. परंतु रुममधील मिनीबारमधून घेतलेल्या पाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. परंतु खोल्यांमध्ये अतिथींना पाण्याची विनामूल्य बाटली उपलब्ध असेल तर तुम्ही ती घरी घेऊ शकता.
2. चहा / कॉफी किट्स: बर्याच हॉटेलच्या खोल्यांमध्ये चहा / कॉफीच्या किटसह इलेक्ट्रिक केटल असतात. त्यात चहाच्या पिशव्या, कॉफी सॅशेट्स, दुधाची पावडर आणि साखर असतात. त्यावरील शुल्काचा वेगळा उल्लेख न केल्यास आपण ते घरी घेऊ शकता. हे माहित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या हॉटेलने काय सोयी दिल्या आहेत हे माहित असणे गरजेचे आहे.
3. शिवणकामाचे किट्स : सुई, धागा, बटणं यासह कॉम्प्लीमेंटरी सर्विस म्हणून देऊ केलेल्या गोष्टी आपण घरी घेऊन जाऊ शकता.
4. ओरल हाईजिन किट्स : आपण टूथब्रश आणि टूथपेस्टची मिनी-पॅक घरी घेऊ शकता.
5. स्टेशनरी : मोनोग्राम केलेले नोटपॅड, लिफाफे, पेन्सिल, पेन इत्यादी घरी घेऊन जाऊ शकता.
6. टॉयलेट गुड्स : इयरबड्स, कॉटन पॅड्स, शेव्हिंग उत्पादने, साबण, शैम्पू, बॉडी लोशन, कंडिशनर, शॉवर कॅप्स, बाथरूम चप्पल देखील हॉटेलच्या खोलीतून घरी घेऊन जाता येते.
हॉटेलमधून तुम्ही कोणत्या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकत नाही?
1. हॉटेलच्या खोलीतून कोणताही पाहुणे टॉवेल्स, बाथरोब, साबण होल्डर, आरसे इत्यादी घेऊ शकत नाहीत.
2. केबल बॉक्स, अलार्म घड्याळ, टीव्ही रिमोट कंट्रोल, इस्त्री, चहाची केटल, हेअर ड्रायर इत्यादी विद्युत उपकरणांना घरी नेण्याची परवानगी नाही.
3. याशिवाय घोंगडी, उशा, उशाचे कव्हर्स, पडदे, चादरी, आराम करण्याची गादी इत्यादींनाही घरी नेण्याची परवानगी नाही.
4. हॉटेल आवारात बसवलेली पेंटिंग्ज, ऐशट्रे, मग, हॅंगर्स, इस्त्री बोर्ड, धूपबत्ती, मॉस्किटो रिपेलेंट, दिवे, कटलरी इत्यादींनाही घरी नेण्याची परवानगी नाही.
जर हॉटेलच्या खोलीतून काही वस्तू चोरल्या गेल्या तर?
जर कोणी हॉटेलच्या खोलीतून एखादी वस्तू चोरताना पकडला गेला असेल, तर सामान्यत: त्यांच्याकडून या वस्तूंसाठी शुल्क आकारले जाते. म्हणूनच काही हॉटेल्स या वस्तूंवर प्राईझ टॅग लावतात. अशा परिस्थितीत, जर आपल्या खोलीतून या वस्तू गहाळ झाल्या असतील, तर आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल. या व्यतिरिक्त हॉटेल तुम्हाला ब्लॅकलिस्ट देखील करू शकतात.
ब्लॅकलिस्टमध्ये आल्यानंतर, भविष्यात आपण या हॉटेलच्या कोणत्याही शाखेत पुन्हा कधीही राहू शकणार नाही. आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार हॉटेल अधिकार्यांना देखील आहे.