मुंबई : मेसेजिंग ऍप आल्यानंतर लोक आता फोनवर कमी आणि चॅटिंगमध्ये एकमेकांशी बोलू लागले आहेत. ज्यामुळे चॅटिंग ऍप्सने देखील बजारात नवीन फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये एक गोष्ट आहे जी चॅटिंग दरम्यान सर्वाधिक वापरली जाते, ती म्हणजे इमोजी. इमोजीचा वापर करुन आपण आपल्या भावना समोरील व्यक्तीला सांगतो. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ शकता, ज्यामध्ये तुमच्या भावना जाणून घेतल्या जातात. असे अनेक इमोजी आहेत, जे लोक दररोज वापरतात, परंतु त्यांचा खरा अर्थ त्यांना माहित नसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा एक इमोजी आहे, जो गेल्या वर्षभरात सर्वाधीक वापरला गेला आहे, परंतु तरी देखील लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीय. चला तर या इमोजीबद्दल जाणून घेऊया


कोणता इमोजी सर्वाधिक पाठवला जातो?


युनिकोड कन्सोर्टियमच्या अहवालात ही बाब समोर आली आहे की, सर्वाधिक पाठवलेला इमोजी म्हणजे आनंदाश्रू असलेला चेहरा. या इमोजीमध्ये डोळ्यात अश्रू आहेत, तर चेहऱ्यावर खूप हसू आहे.


परंतु या इमोजीचा खरा अर्थ काय?


जेव्हा एखादी व्यक्ती जास्त आनंदी असते, तेव्हा हा इमोजी वापरला जातो, म्हणजे हसताना डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.


यानंतर, लोक सर्वात जास्त इमोजी वापरतात तो म्हणजे रोड हार्ट, तर दुखी चेहऱ्याचा इमोजी तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, चौथ्या स्थानावर रोलिंग ऑन द फ्लोर हसू (Rolling on the floor laughing) आहे, ज्याचा इमोजीमध्ये थोडासा वाकडा चेहरा आहे. पाचव्या स्थानी थम्स वापरला जातो.


त्याचवेळी सहाव्या स्थानावर लाऊडली क्रायिंग फेस आहे, सातव्या स्थानावर फेस ब्लोइंग किस, आठव्या स्थानावर स्माईलिंग फेस विथ हार्ट्स, नवव्या स्थानी स्पिलिंग फेस, तर दहाव्या स्थानी स्माईलिंग फेस विथ स्माइलिंग आईज आहेत.