नवी दिल्ली : विवीध कंपन्यांची गोफनीय आणि प्रमुख माहिती व्हाट्सअॅपच्या माध्यमातून लीक झाल्याने शेअर बाजार आणि आर्थिक वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सेबी आणि शेअर बाजारातील 2 डजनांहून अधिक भागधारकांचा व्यापार तपशील (ट्रेड डिटेल्स) तपासण्यास सुरूवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही माहिती लीक करणाऱ्याचा संशय असलेल्या सर्व व्यक्तिंकडी फोन कॉल, मेसेज, इंटरनेट आणि व्हाट्सअॅपचे तपशील मागविण्याबाबतही प्रामुख्याने विचार सुरू आहे. विशेष असे की, माहिती लीक झालेल्या कंपन्यांमध्ये नामांकीत आणि तितक्याच प्रतिष्ठीत कंपन्यांचाही समावेश आहे. शेअर बाजारात घडत असलेल्या काही धक्कादायक घडामोडींमुळे संशय आल्याने गेली 12 महिने सेबी आर्थिक तपशीलावर बारीक लक्ष ठेऊन आहे. यासाठी सेबी आपल्या गुप्त स्त्रोतांद्वारेही माहिती मागवत असल्याचे समजते.


या सर्व घडामोडींसोबतच सेबी नोंदणीकृत कंपन्यांची आर्थिक माहिती देणाऱ्या सोशल मीडिया समुहांवरही शेअर केल्या जाणाऱ्या माहितीचा तपशील मागवला जाणार असल्याची माहिती आहे.