मुंबई : लग्नानंतर प्रत्येक जोडपी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतात. लव्ह मॅरेजमध्ये नववधू आणि नवरदेव आधीपासूनच एकमेंकांना ओळखत असतात, त्यामुळे त्यांच्यावर तितकाचा जास्त परिणाम होत नाही. परंतु घरच्यांच्या समंतीने केलेल्या लग्नात मात्र नवरदेव आणि नववधूला एकमेकांना समजून घ्यायला बराच काळ जातो. ज्यामध्ये दोघांनी एकमेकांना समजून घेण फारच महत्वाचं आहे. हे सगळं खरं असलं तरी एक अशी बातमी समोर येत आहे. जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर ही  ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील आहे. येथे 27 जानेवारीला मिर्झापूरच्या विंध्याचलमध्ये एक लग्नसोहोळा पार पडला. लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचलेल्या मुलीने हनिमूनच्या दिवशीही पतीला शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. त्या दिवसानंतर अनेक दिवस हे असंच सुरु राहिलं. ज्यामुळे नवरा तिच्यावर चिढला आणि त्याने तिच्यावरती जबरदस्ती केली.


परंतु असे करणे या नवऱ्याला फारच महाग पडले, कारण या बायकोनं, त्याच्या प्रायवेट पार्टचा चावा घेतला. परंतु एवढं करुन ती थांबली नाही, तर तिने आणखी एक झटका आपल्या नवऱ्याला दिला.


प्रायवेट पार्टचा चावा घेतल्यामुळे नवरा कळवळला आणि तेथे बेडवरती पडला आणि काहीवेळाने दुसऱ्या खोलीत पळून गेला. ज्याचा फायदा घेत या बायकोनं घरातील सगळे पैसे आणि दागिने बॅगेत भरत, तेथून पळ काढला.


नवरी निघाली दरोडेखोर


खरेतर ही नवरी दरोडेखोर होती आणि दरोडा टाकण्याच्या उद्धेशाने तिने या व्यक्तिशी लग्न केलं. ज्यामुळे ती नवऱ्याला शरीर संबंध ठेऊ देत नव्हती. ज्यानंतर संधी मिळताच या लूटेरी दुल्हनने घरातील सगळं काही साफ करुन पळ काढला.


जेव्हा नवऱ्याला हे लक्षात आले, तेव्हा त्याने पोलिसांकडे धाव घेतली. नवऱ्याच्या तक्रारीने स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता आरोपी दरोडेखोर वधूचा शोध सुरू आहे.