मुंबई : जगात असे अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी गरजू विद्यार्थांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्यांच्या एका मदतीमुळे आज जगाला विविध क्षेत्रातील अभ्यासू किंवा तज्त्र भेटले आहेत. सर्वांना माहित आहे, टाटा कंपनी उद्योगासोबतचं सामाजिक कार्यात देखील एक पाऊल पुढे आहेत. टाटा ग्रुपची स्थापना जमशेदजी नौशेरवान टाटा यांनी केली होती. त्यांनी अनेकांना मदत देखील केली. त्यांनी 81 वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्याला शिक्षणात मदत केली आणि त्यानंतर त्याचं विद्यार्थ्याने देशाचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला.  
 
टाटा यांनी मदत केलेले ते विद्यार्थी म्हणजे 1997 साली देशाच्या राष्ट्रपती पदाचा मान मिळवणारे के. आर नारायणन यांच्याबद्दल जेआरडी टाटा  यांनी काहीही माहिती नव्हतं. तरी देखील टाटा यांनी के. आर नारायणन यांची मदत केली. टाटा सन्सचे Brand Custodian हरीश भट  यांनी जेआरडी टाटा आणि के.आर. नारायणन यांची गोष्ट लिंक्डइनवर शेअर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हरीश भट यांनी सांगितलं की जेआरडी टाटा यांनी के.आर. नारायणन यांची मदत केली होती. नारायणन जेव्हा त्रावणकोर यूनिवर्सिटीमधून पदवी परिक्षा पास झाले. तेव्हा त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचं होतं. परंतु त्यांची आर्थित परिस्थिती फार काही चांगली नव्हती. तेव्हा जेआरडी टाटा यांनी एन्डॉयमेंटला पत्र लिहून त्यांना 16 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आणि 1000 रूपये कर्ज म्हणून दिले.


जेआरडी टाटा यांच्या मदतीनंतर के. आर नारायणन इंग्लंडला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ते 1949 साली भारतीय परदेशी सेवेत रुजू झाले. 1992 साली त्यांनी देशाच्या उप-राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर अखेर 1997 साली ते देशाचे राष्ट्रपती झाले.