नवी दिल्ली  : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे चुकून संसदेतील आपल्या भाषणात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारला जातात, त्यांना नरेंद्र मोदी 'बाहेर' म्हणजेच 'बाहेर देशातील दौऱ्याला जातात' असं म्हणायचं होतं, पण नरेंद्र मोदी 'बारला जातात' असं चुकून राहुल गांधी बोलल्याने संसदेत सर्व खासदार खळाळून हसत होते. राहुल गांधी यांचं हे 'स्लिप ऑफ टंग' होतं असं म्हटलं जातंय. (बातमीत पाहा हा संपूर्ण व्हिडीओ)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आप बाहर देश जाते हो, असं राहुल गांधी यांना म्हणायचं होतं, त्याऐवजी ते मोदींना तुम्ही बारला जातात असं म्हटल्याने संसदेत जोरदार हशा पिकला.



राहुल गांधी यांचं हे स्लिप ऑफ टंग सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतं, आणि यावरून राहुल गांधी यांना विरोधक ट्रोल देखील करत असतात, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची संसदेत भाषणादरम्यान त्यांच्या जागेवर जाऊन गळाभेट घेतली. 


दरम्यान त्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले होते, मला कुणी पप्पू म्हणा, शिव्या द्या, मला तुमचा राग नाही, तसूभरही माझ्या मनात राग नाही, पण तुमच्या मनात राग आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.