नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण चर्चेत आलंय. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फैलावर घेतलं... मात्र, नेहमीप्रमाणेच यावेळीही भाषणादरम्यान राहुल गांधींचं भाषणातील एक वाक्य हास्याचा विषय ठरलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालं असं की, 'मोदी बाहेर जातात ते केवळ परदेशात जाण्यासाठी' असं राहुल गांधींना म्हणायचं होतं... पण, राहुल गांधींचा जीभेवरचा ताबा सुटला आणि त्यांनी 'बाहेर'ऐवजी 'बार' म्हटलं... आणि मग काय संसदेत एकच हास्यकल्लोळ उडाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राहुल गांधींच्या या वाक्यावर आपलं हसू आवरलं नाही... आणि तेदेखील खळखळून हसताना दिसले. 



'मोदी बारमध्ये जातात' हे राहुल गांधींचं वाक्य काही वेळातच ट्रोलर्सनीही उचलून धरलंय. 






आपल्या भाषणात राहुल गांधींनी, काही उद्योगपतींशी पंतप्रधान मोदींचे संबंध सर्वश्रुत फ्रान्स तसंच भारतात कोणताही करार झालेला नाही, असे गंभीर आरोपदेखील केलेत.