प्रेम की फसवणूक? मुलाच्या पूर्व पत्नीशीच केलं सासऱ्याने लग्न....
हा नात्यांचा गुंता कसा सोडवायचा असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे.
यूपी : कधी कधी काही नाती अशी गुंतागुंतीची असतात की, बऱ्याचदा आपल्याला ही यामध्ये गैरसमज होतात. यूपीमधील एका कुटूंबातून देखील असेच गुंतागुंतीचे नातं समोर आलं आहे. कारण यामध्ये एका तरुणाच्या पूर्व पत्नीने त्या तरुणाच्या वडिलांसोबत केलं आहे. म्हणजेच या पत्नीचे सासरे आता तिचा नवरा झाला आहे. तर तिचा नवरा तिचा सावत्र मुलगा झाला आहे. (wife become a step mother of man) आहे ना अगदी गुंतागुंतीचं नातं? हा प्रकार पाहून आजुबाजूच्या सगळ्याच लोकांना धक्का बसला आहे. एवढचं काय तर हा नात्यांचा गुंता कसा सोडवायचा असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे.
यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की, जेव्हा हा तरुण जिल्हा पंचायती राज कार्यालयात आपल्या वडिलांविरोधात आरटीआय दाखल करायला गेला तेव्हा त्याला या गोष्टीचा खुलासा झाला. त्या या गोष्टीची माहिती आधी नव्हती कारण त्याच्या वडिलांनी त्याला घरा बाहेर काढले होते.
2016 मध्ये झाले तरुणाचे पहिले लग्न
सूत्रांच्या माहितीनुसार, मुलाचे 2016 साली एका मुलीसोबत लग्न झाले होते आणि त्यावेळी दोघेही अल्पवयीन होते. लग्नानंतर अगदी सहा महिन्यांनंतर ते वेगळे झाले. त्यानंतर या तरुणाने बायकोला समजावण्याचा आणि पुन्हा संसार थाटण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु तरीही त्या मुलीने हा तरुण दारुडा असल्याचे सांगून लग्न तोडले.
त्यानंतर वडिलांनी पैसे देणे बंद केले आणि नंतर त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर वडिलांनी घराबाहेर काढल्यानंतर मुलाने वडिलांविराधात आरटीआय दाखल केला. त्यानंतर त्याला या गोष्टीचा खुलासा झाला की, त्याची पूर्व बायको ही आता त्याच्या वडिलांची बायको झाली आहे. (wife become a step mother of man)
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
शेवटी जेव्हा आरटीआय दाखल केल्यानंतर या तरुणाच्या लक्षात आले की, खरोखर त्याच्या वडिलांनी आपल्या पूर्व पत्नीसोबत लग्नं केले आहे. तेव्हा त्याने बिसौली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि शनिवारी दोन्ही पक्षांना भेटीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले.
शनिवारी पोलिसांसोबत झालेल्या त्या बैठकीत दोन्ही पिता-पुत्र आक्रमक झाले होते आणि पोलिसांचे देखील ऐकायला तयार नव्हते.
पोलिस अधिकारी या घटनेबद्दल सांगताना म्हणाले, “जेव्हा दोघांनी लग्न केले तेव्हा ते अल्पवयीन असल्यानं त्यांच्या लग्नाचे कोणतेही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे आम्ही देखील यात काही करु शकत नसल्याने आम्ही अद्याप गुन्हा नोंदवला नाही.
आता पुढील सत्रांसाठी या दोन्ही बाजूंना नोटीस दिल्या जातील त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल.