मुंबई : सोशल मीडियावरील व्हिडीओ किंवा मीम्स नेहमीच आपले मनोरंजन करत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही आपल्याला आयुष्यातील सत्यता सांगतात आणि त्याची आपल्याला त्याची जाणीव करुन देतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. जो लोकांना मजेशीर रित्या आयुष्यातील एक सत्य बाजू दाखवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा एखादी व्यक्ती लग्नाआधी एखाद्या मुलीला प्रपोज करतो किंवा त्याला एखादी मुलगी आवडते, तेव्हा ती त्याच्यासाठी जगातील सर्वोत्तम मुलगी असते. त्यामुळे तो तिल इंप्रेस करण्यासाठी प्रयत्न करत असतो.


तिच्यासाठी तो जगातील कोणतीही गोष्ट करायला तयार होते, मग ती गोष्ट कितीही कठीण असली तरी चालते. पण जर तिच मुलगी जेव्हा गर्लफ्रेंडपासून बायको बनते तेव्हा, तो व्यक्ती आपल्या खऱ्या रुपात येतो.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून बनवला गेला होता. या व्हिडीओमध्ये स्वत: प्रसिद्ध कॉमेडियन गौरव कपूरने अभिनय केला आहे.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी जेव्हा एखाद्या मुलाची गर्लफ्रेंड असते तेव्हा तो तिला इंप्रेस करण्यासाठी अशक्य गोष्टं देखील शक्य करुन देखवतो, परंतु तो प्रियकर जेव्हा त्याच मुलीचा नवरा होतो तेव्हा त्याची शैली बदलते.


तुम्ही देखील व्हिडीओमध्ये फरक पाहू शकता की, हा व्हिडीओमधील व्यक्ती प्रियकर असताना अगदी आरामात पाण्याची बादली उचलतो, तिच बादली तो जेव्हा नवरा होतो. तेव्हा मात्र त्याला उचलायला जड जाते. त्यावेळी तुम्ही त्याचे ड्रेसिंगमधील बदल देखील पाहू शकता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ इंटरनेटवर सध्या बराच व्हायरल होत आहे. काही लोकांना हा सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पटला आहे ज्यामुळ लोकं यावर वेगवेगळे कमेंट्स करत आहेत. एका यूझरने कमेंट केली की, 'लग्न हा असा चित्रपट आहे, ज्याचा ट्रेलर तर चांगला असतो, पण चित्रपट नाही.'