नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे की 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहेत. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सोशलमीडियावर परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील हॅशटॅग ट्रेंड केला आहे.
 
 मे महिन्यात होणारी सीबीएसई बोर्डाची 10 वी आणि 12 वीची परीक्षा आपल्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. सीबीएसई बोर्डाची 10 वीची परीक्षा 4 मे ते 7 जून पर्यत होणार आहे. त्यातच सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा 4 मे 2021 ते 11 जून पर्यंत होणार आहेत.
 
 बोर्ड परीक्षा रद्द करण्यासाठी ट्विटरवर विद्यार्थ्यांनी अभियान राबवले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर #cancelboardexams2021,#CancelourCBSEboardexams2021 हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
 
 परंतु वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने परीक्षांच्या संदर्भात कोणतेही सुधारीत सूचना जारी केलेल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे तयारी करणे गरजेचे आहे.