Share Market Sell And Buy: शेअर मार्केट असा शब्द उच्चारला की, कोट्यवधींची उलाढाल दिसते. पण काळ बदलला आणि छोटे गुंतवणूकदारही शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले. ऑनलाईन अॅपमुळे तर शेअर्स खरेदी विक्री करणंही सोपं झालं आहे. या माध्यमातून काही लोक दीर्घ काळासाठी पैसे गुंतवतात, तर काही लोक रोज म्हणजेच इन्ट्राडे गुंतवणूक करतात. पण काही लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतरही संभ्रम असतो. त्यामुळे नेमके शेअर्स विकत घेतल्यानंतर कधी विक्री करायची? असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार बसंत माहेश्वरी यांनी काही टिप्स दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसंत माहेश्वरी वेल्थ अॅडव्हायजर्स एलएलपीचे सह-संस्थापक बसंत माहेश्वरी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, "जर तुम्ही ब्रोकरेज अहवाल पाहिला तर तुम्हाला प्रत्येक तिमाहीत विक्री करायची आणि नंतर पुढील तिमाहीत खरेदी करायची असं दिसेल. दुसरीकडे, आयटी कंपन्या म्हणतील की, मंदीचं सावट येताच शेअर्स विकून टाका. त्याच वेळी, ब्रोकरेज देखील विक्री करण्याचा सल्ला देतील पण तुम्ही तसं करू नका."


बसंत माहेश्वरी यांनी सांगितले की, "शेअर कधी विकायचा याचे बरोबर उत्तर असेल की जेव्हा तुम्हाला शेअरची टर्मिनल व्हॅल्यू संपलेली दिसेल तेव्हा शेअर विकून टाका. मात्र, चांगल्या कंपनीच्या बाबतीत कधी विक्री करायची अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात."


बसंत माहेश्वरी यांनी सांगितले की, "बाजारात चढ-उतार असतात पण याचा अर्थ कोणताही स्टॉक विकायचा असा होत नाही. जेव्हा एखाद्या बिजनेसमध्ये कायमचा अडथळा आला आहे असं वाटेल तेव्हाच शेअर्स विकावा."


(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. Zee 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)