लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे समर्थक नेहमीच पाहत असतात. पंतप्रधान होण्याबाबतचा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणत्याही पदाचा दावेदार नाही. मी एक योगी आहे. पक्षानं मला उत्तर प्रदेशच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी त्यांची सेवा करत आहे, असं उत्तर योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.


ब्रँड मोदी अजूनही सशक्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रँड मोदी हा देशाचा ब्रँड बनला आहे. मोदींना दुसऱ्या कोणाचाही पर्याय नाही. लोकसभा निवडणुका राष्ट्रीय मुद्द्यांवर लढल्या जातात. लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपला यश मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.


सपा-बसपा युतीवरही टीका


सपा आणि बसपामध्ये झालेल्या युतीवरही योगींनी टीका केली आहे. ही युती आहे का सत्तेसाठीची सौदेबाजी आहे, असा सवाल योगींनी उपस्थित केला आहे. अखिलेश यादव, मुलायम सिंग, मायावती, राहुल गांधी यांच्यापैकी या युतीचा नेता कोण असेल, असंही योगींनी विचारलं आहे.


रामदास आठवलेंचा अंदाज चुकीचा


उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा युती २०१९ साली २५-३० जागा जिंकेल, असं भाकीत रामदास आठवलेंनी वर्तवलं होतं. रामदास आठवलेंचा हा अंदाज चुकेल, असं योगी आदित्यनाथ म्हणालेत.