Chandrayaan-3 : अपयशावर मात करत भारताने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या आहेत.  चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे.  इस्रोचे शास्त्रज्ञ चांद्रयानाच्या  कक्षाशी संबंधित डेटाचे विश्लेषण करत आहेत.  चंद्राकडे झेपावलेलं चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लोकेशन शेअर केली आहे.   


40 दिवसांनंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

40 दिवसांचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.


चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? 


चांद्रयान-3 आता पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत 41 हजार 762 पेक्षा जास्त कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-३ ची पहिली कक्षा युती यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 हे सामान्य स्थितीत असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. 


चांद्रयान अवकाशात नवा इतिहास लिहिणार


श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर २ वाजून ३५ मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर 16 व्या मिनिटाला LVM-3 रॉकेटनं 179 किलोमीटरच्या प्रवासानंतर चांद्रयानाला अवकाशात सोडलं. चांद्रयान सध्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत संचार करत आहे. यानंतर चंद्राजवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल. 23-24ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. साधारणपणे पाच ऑगस्टच्या दरम्यान चंद्राच्या कक्षेत चांद्रयानाचा प्रवेश होईल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल.  चांद्रयान 2 मोहिमेवेळी झालेल्या चुका या मोहिमेमध्ये सुधारण्यात आल्या आहेत. विक्रम लँडरच्या पायांची ताकद वाढवण्यात आली आहे.  नवे सेंसर्स लावण्यात आले आहेत.  गेल्या वेळी लँडिंग साईटचं असलेलं 500 बाय 500 मीटरचं क्षेत्रफळ यंदा 4 बाय अडीच किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आल आहे.  यंदा विक्रम लँडरला जास्त प्रमाणात ट्रॅकिंग, टेलिमेट्री आणि कमांड अँटिना लावण्यात आलेत. चूक झालीच तर विक्रम लँडर 96 मिलिसेकंदांमध्ये चूक सुधरु शकतो असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.