रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात असल्याचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला होता. यावर केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यादीत उत्तर प्रदेशचा पहिला नंबर लागतो. कस्टडीत सर्वाधिक मृत्यू हे उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल, बिहार आणि चौथ्या नंबरवर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 2020-21 मध्ये 143 तर 2021-22 मध्ये 197 जणांचा मृत्यू कोठडीत झाला आहे. म्हणजेच राज्यात 2020-21 च्या तुलनेत 21-22 या वर्षी कोठडीत मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 


पहिल्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये 2020-21 मध्ये 451, 2021-22 मध्ये 501 जणांचा कोठडीत मृत्यू झाला. दुसऱ्या नंबरवर असलेल्या बंगालमध्ये 2020-21 मध्ये 185 आणि 2021-22 मध्ये 257 जणांचा कोठडीत मृत्यू झाला. तर तिसऱ्या नंबरवर असलेल्या बिहारमध्ये 2020-21 मध्ये 159 तर 2021-22 मध्ये 237 जणांचा कोठडीत मृत्यू झाला आहे.