मुंबई : इंटरनेट हे मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओंनी भरलेले जग आहे. येथे आपल्याला केव्हा काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. हे व्हिडीओ आपलं नेहमीच मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडीयावर समोर आला आहे. जो आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडेल. खरंतर आपल्या शिक्षकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वर्गातील मुले कार्यक्रम ठरवतात. परंतु त्या दरम्यान एक विद्यार्थी असं काहीतरी करतो की, अखेर त्याला आपल्या शिक्षतकाचा मार खावा लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, शिक्षकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे. वर्गातील मुले शिक्षकाचा वाढदिवस साजरा करत आहेत.


तेव्हा शिक्षक समोर खूर्चीवर बसले आहे. तेव्हाच एक विद्यार्थी समोर येतो आणि शिक्षकावर स्नो स्प्रे करु लागतो. खरंतर त्याचं हे वागणं शिक्षकांला अवडलं नाही. ज्यामुळे तो शिक्षक आपल्या जागेवरुन उठतो आणि त्या मुलाच्या पाठीत धपाटे मारु लागतो.


खरंतर हा विद्यार्थी काहीतरी चांगलं आणि वेगळं करण्याच्या उद्देशाने स्नो स्प्रे करु लागला, परंतु त्याला कुठे माहित होतं की, त्याला आपल्या शिक्षकाकडून शाबासकी ऐवजी धपाटे खावे लागतील.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ सोशल मीडीयावर वाऱ्यासारखा पसरला आहे. ज्यामध्ये अनेक युजर्सनी आपले अनुभव देखील शेअर केले आहे.


हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर mr.bravex नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे.