हैदराबाद: सेल्फीचा नाद कसा जीवावर बेतू शकतो याच थरकाप उडवणार दृश्य हैद्राबादमध्ये पहायला मिळाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद भरतनगर रेल्वे स्टेशनजवळ शिव नावाचा तरूण सेल्फी स्टंट करतांना रेल्वेखाली चिरडला गेला. रेल्वेच्या रूळावर उभं राहून येणाऱ्या ट्रेनसमोर सेल्फी काढतांना अंदाज न आल्यानं सेल्फी काढणाऱ्या शिवला ट्रेनन चिरडल. सुदैवी ठरलेल्या शिव जीव वाचला असला तरी आयुष्यभराच अपंगत्व येण्याची शक्यता आहे.


जीवाचा थरकाप उडवणार हे दृश्य शिवच्या मोबाईलमध्ये कैद झाल आहे.यापूर्वी देखील सेल्फी काढतांना अतिउत्साहाच्या भरात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मानसोपचार तज्ञांनी देखील हा मानसिक आजार असल्याच जाहीर केलय. अस असतांना धोकादायक ठिकाणी किंवा थरारक पध्दतीनं सेल्फी काढण्याच्या घटना वाढतायेत ही चिंतेची बाब आहे.



जीवाचा थरकाप होणार हा व्हिडीओ वेगान सोशल मिडीयावर व्हायरल होतांना दिसतोय पण यातून बोध घ्यायला हवा