मुंबई : कोरोनाची दुसरी लाट कहर करत असताना त्यात ब्लॅक फंगस नावाचा एक नवीन आजार उद्भवला. काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत असताना आता पांढरी बुरशीचा आजार देखील आला आहे. बिहारमध्ये पांढर्‍या बुरशीचे 4 रुग्ण आढळले आहेत. पाटण्यातील एक डॉक्टर देखील या संक्रमित रुग्णांमध्ये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पांढऱ्या बुरशीचा आजार हा काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांढरी बुरशी का अधिक धोकादायक?


आरोग्य तज्ञांच्या मते, काळ्या बुरशीपेक्षा पांढरी बुरशी जास्त धोकादायक आहे कारण यामुळे फुफ्फुसांवर तसेच शरीराच्या इतर भागावर परिणाम होतो जसे की नखे, त्वचा, पोट, मूत्रपिंड, मेंदू, खाजगी भाग आणि तोंड. डॉक्टरांनी सांगितले की, पांढरी बुरशी देखील फुफ्फुसांना संक्रमित करते. संक्रमित रूग्णाच्या सीटी स्कॅनवरून असे दिसून येते की हा देखील कोरोनाचा सारखाच संसर्ग पसरवत आहे.


पांढरी बुरशी कोठून येते?


रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रानुसार ही बुरशी वातावरणात असते. विशेषत: माती आणि सडलेली सेंद्रिय सामग्री जसे की पाने, कंपोस्ट खते किंवा कुजलेल्या लाकडामध्ये.


म्युकोर्मिकोसिसची लक्षणे कोणती आहेत?


तज्ञांच्या मते, वेळेवर उपचार न केल्यास म्युकोर्मिकोसिस खूप धोकादायक ठरू शकते. डोकेदुखी, चेहऱ्यावर सूज येणे, कमी दिसणे, डोळ्यात वेदना, डोळ्यांना सूज येणे, नाकात दुखणे, खोकला, रक्ताच्या उलट्या आणि मानसिक स्थिती बदलणे ही लक्षणे आहेत.


म्युकोर्मिकोसिसवर उपचार काय?


अँटी फंगल इंजेक्शन, ज्याची किंमत एका डोससाठी 3,500 रुपये आहे. आठ आठवड्यांसाठी ते दररोज द्यावे लागेल. यावर्षी मार्च महिन्यात, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मुंबई-आधारित बायो-फार्मास्युटिकल फर्म भारत सीरम आणि व्हॅक्सीन्स लिमिटेड या कंपनीला लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी किंवा एलएएमबी या अँटी-फंगल औषध वापरण्यास मान्यता दिली आहे.