मुंबई : तज्ञांनी असे नमूद केले आहे की, अनियंत्रित मधुमेह असलेल्या कोविड -19 रूग्ण ज्यांच्यावर स्टेरॉइड्स, टॉसिलीझुमॅब आणि वेंटिलेशनमध्ये उपचार केले गेले आहेत किंवा सुरु आहेत. त्यांना म्यूकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) चे वरिष्ठ न्यूरो सर्जन डॉ. पी. शरत चंद्र यांनी सांगितले की, कोविड -19 च्या उपचारानंतर 6 आठवड्यांच्या आत काळ्या बुरशीची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळी बुरशी होण्याचे सर्वात महत्वाचे कारणं म्हणजे अनियंत्रित मधुमेह, टॉसिलीझुमॅबसह स्टिरॉइड्सचा वापर, वेंटिलेशनवरील रूग्ण आणि सप्लीमेंटल ऑक्सिजन घेणे यांचा समावेश आहे. एम्समध्ये न्यूरोसर्जरी शिकवणारे डॉ. चंद्रा म्हणाले की, कोविडच्या उपचारानंतर सहा आठवड्यांमध्ये लोकांना या काळ्या बुरशीचा सर्वाधिक धोका असतो.


कोल्ड ऑक्सिजनमुळे 'ब्लॅक फंगस'चा धोका


डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की, सिलिंडरमधून थेट ऑक्सिजन दिल्यामुळे देखील काळ्या बुरशीचा धोका उद्भवू शकतो. या आजाराने ग्रस्त रूग्णांना पॉसकोनाजोल नामक फंगल विरोधी औषध दिले जाऊ शकते.


फेस मास्कचा दीर्घकालीन वापर करण्याबद्दलही डॉक्टरांनी चेतावणी दिली आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला की एन-95 मास्कचा पाच वेळा उपयोग केल्यानंतर फोकून द्यावा. तसेच कपड्याचा मास्क दररोज धुतलेला असावा.


डॉ. चंद्रा यांनी ओलसर ठिकाणी मास्क ठेवू नये असा सल्ला दिला आहे. कारण ओलसरपणामुळे बुरशी लागण्याची शक्यता जास्त आहे. या काही गोष्टींचे आपण पालन केले तर म्यूकरमायकोसिस पासून तुमचा बचाव होऊ शकतो.