Indian Railways :  भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलं आहे. लांब पल्ल्याचा प्रवास आणि आरामदायक म्हणून लोक रेल्वेला पसंती देतात. लोकांचा कल हा रेल्वेकडे वाढला पाहिजे म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून अनेक योजना आणि सुविधा पुरवल्या जातात. तुम्ही पण ट्रेनमधून प्रवास केला असेल. त्यावेळी ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. रेल्वेतील अपर बर्थ, मिडल बर्थ आणि लोअर बर्थ प्रवासी जेव्हा बसून जातात तेव्हा त्यांना कुठे बसायचं असतं यावरुन संभ्रात असतात. आज आपण जाणून घेऊयात नेमकं कोणी कुठे बसायचं असतं ते. 


विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर स्लीपर किंवा एसी कोचमध्ये विंडो सीटबद्दल तिकीटवर कुठलीही माहिती नसते. साधारण आपण जेव्हा दिवसा रेल्वेतून प्रवास करतो तेव्हा अपर आणि मिडल बर्थवरील प्रवासी हे लोअर बर्थवर बसतात. अशावेळी विंडो सीटवर कोण बसेल असा प्रश्न अनेक वेळा प्रवासी विचारत पडतात. खरं तर रेल्वे विभागाकडून विंडोसीटबद्दल असा कुठलाही नियम नाही. लोअर बर्थ प्रवास करताना प्रवासी एकमेकांच्या सहमतीने कुठं बसायचं हा निर्णय घेत असतात. पण जर तुम्ही चेअर कार कोचमध्ये प्रवास करणार असेल तर तिकीट काढताना तुम्ही विंडो सीटची निवड करु शकतात. 


कोण कुठे बसतो?


साधारण रेल्वेतून प्रवास करताना सीट कोणी कुठे बसायचं हे सर्वस्वी प्रवाशांचा निर्णय असतो. पण साधारण जर तुमचं तिकीट हे लोअर बर्थ असेल तर तुम्ही विंडो सीटवर बसता. विंडो सीट प्रवाशाच्या बाजूला म्हणजे मध्यभागी मिडल बर्थचा प्रवासी बसतो. तर त्यानंतर सीटच्या सुरुवातीला अपर बर्थवरचा प्रवासी बसतो. रेल्वेतून प्रवास करताना साधारणपणे अशाप्रकारे प्रवाशी प्रवास करत असतात. 


झोपण्याबद्दल आहे का कुठला नियम?


स्लिपर कोचमधून प्रवास करणारे प्रवासी केवळ रात्रीच सीटवर झोपू शकतात. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत प्रवासी आपल्या सीटवर झोपू शकतात. पण हेदेखील प्रवाशी एकमेकांच्या सहमतीने ही वेळ कमी अधिक होऊ शकते. 


रेल्वेतील प्रवास हा 'माणुसकीचा' 


हो खरं तर रेल्वेतील प्रवास हा 'माणुसकीचा' असतो. कारण या रेल्वे कोचमध्ये वृद्ध व्यक्तीपासून तान्हुल्या बाळापर्यंत प्रवास करत असतात. एखादा प्रवासी हा वृद्ध असेल आणि त्याला अपर बर्थचं तिकीट मिळालं असेल. अशावेळी लोअर बर्थचा व्यक्ती त्याला आपला बर्थ देऊ शकतो. त्यामुळे रेल्वेतील प्रवास करताना एकमेकांच्या सहकार्याने हा प्रवास सुखकर करायचा असतो. पण अनेक वेळा काही लोकांच्या मुर्खपणामुळे काही वादही झाल्याचं आपण ऐकले आहेत.