नवी दिल्ली : दस-या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्राची पूजा करते. परंतु एके ४७ आणि अटोमेटीक गन सारखी शस्त्राचा परवाना आरएसएसला कुणी दिला? असा सवाल भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शस्त्रपूजन करतात. ही शस्त्रं साधी नाहित तर ऑटोमेटिक आहेत. अशी ऑटोमेटिक शस्त्र फक्त लष्कराच्या ताब्यात असतात आणि लष्करच ही शस्त्र वापरू शकते. इथले पोलीसही अशी शस्त्र वापरू शकत नाही. त्यामुळे आरएसएसनं ही शस्त्र कुठून विकत घेतली आणि याची चौकशी होणार आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.